राजपथावर दिमखादार संचलन संपन्न

राजपथावर दिमखादार संचलन संपन्न

  • Share this:

// ]]>

 

26republicday_bannerनवी दिल्ली - 26 जानेवारी : देशाचा आज 67 वा प्रजासत्ताक दिन...त्यानिमित्ताने नवी दिल्लीच्या राजपथावर आज देशाचा सामर्थ्याचं दर्शन घडणार आहे. विविध राज्याचे चित्ररथ संचलन करणार आहे. तिन्ही सेनांच्या तुकड्या परेड करतील आणि यावेळचं विशेष आकर्षण आहेत प्रमुख पाहुणे म्हणून असणारे फ्रान्सचे अध्यक्ष फ्राँस्वा ओलांद.. ओलांद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या गाडीतून राजपथावर येतील. त्यानंतर ते मोदींबरोबर बसून परेड बघतील. दरम्यान, यावर्षी परेड 97 मिनिटं चालणार आहे, जी गेल्या वर्षी 114 मिनिटं सुरू होती. 15 राज्य, एक केंद्र शासित प्रदेश आणि 5 मंत्रालयं चित्ररथ सादर करणार आहेत. पर्यावरण, सांस्कृतिक, विज्ञान आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे यावर्षी निवडणूक आयोगाचाही रथ असणार आहे.

लष्कराचं श्वान पथक परेडमध्ये

आज आणखी एक विशेष आकर्षण असणार आहे. ते म्हणजे लष्कराचं श्वान पथक आज परेडमध्ये सहभागी होणार आहे. तब्बल 26 वर्षांनी श्वान पथक परेडमध्ये सहभागी होतंय. 36 श्वान आणि त्यांचे प्रशिक्षक परेडमध्ये भाग घेतील. 36 पैकी 12 लॅब्राडॉग आहेत तर 12 जर्मन शेफर्ड आहेत. ह्या श्वानांना उच्च दर्जाचं आणि अतिशय कठीण असं प्रशिक्षण दिलं जातं. मेरठमध्ये त्याचं प्रशिक्षण केंद्र आहे. 4 महिन्यांपासून ते आजच्या दिवसासाठी सराव करतायेत. सर्वात उत्साही, हुशार आणि ताकदवान श्वानाचं नाव आहे माफिया...माफिया आजच्या श्वान पथकाच्या अग्रस्थानी असेल.

कडेकोट सुरक्षा

26 जानेवारी आयसिस दहशतवादी संघटनेचं सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो स्थानकं, लुट्येन्स दिल्लीचा व्हीआयपी भाग, मोठे मॉल्स, चांदनी चौक, जामा मस्जीद आणि इतर ठिकाणी कडक सुरक्षा आहे. मेट्रो स्थानकांवर इतरवेळीही सामान तपासलं जातं, पण काही दिवसांपासून तिथे जास्त काळजी घेतली जातेय. विमानतळ, मोठी रेल्वे स्थानकं, कोर्ट, मोठी रुग्णालयं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त, आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गुप्तचर विभागही दहशतवाद्यांच्या हालचाली आणि टेलिफोन संभाषणांवर नजर ठेवून आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. मुंबईत 35 हजार पोलीस आणि एफआरपीच्या 12 कंपन्या तैनात रहाणार आहेत.

असा आहे कार्यक्रम

सकाळी 9:40 पंतप्रधान नरेंद्र मोदी अमर जवान ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली वाहतील

त्यानंतर पंतप्रधान राजपथावर पोहोचतील

सकाळी 10 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे फ्रान्सच्या राष्ट्रपती फ्राँस्वा ओलांद यांच्यासोबत

राजपथावर पोहोचतील

त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाईल

सकाळी 10 वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत होईल

राष्ट्रगीतानंतर अशोक चक्र प्रदान केलं जाईल

त्यानंतर संचलनाला सुरुवात होईल

सर्वात पहिल्यांदा फ्रान्स सैनिकांची तुकडी संचलन करेल

त्यानंतर 61 घोडेस्वारांचं संचलन होईल

त्यानंतर देशाच्या संरक्षण सामर्थ्याचं संचलन होईल यात ब्राम्होस, आकाश, स्मर्च आणि मिसाईल यांचं संचलन होईल

यानंतर मार्चिंग होईल

त्यानंतर राजपथावर चित्ररथांचं आगमन होईल

23 चित्ररथ यंदाच्या परेडमध्ये सहभागी आहेत

Follow @ibnlokmattv

First published: January 26, 2016, 8:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading