26 जानेवारीला घातपाताचा कट? आयसिसच्या 6 सहानुभूतीदारांना अटक

  • Share this:

isis_pune_ats

22 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज आयसिसच्या सहानुभूतीदारांवर छापे टाकण्यात येत आहे. या कारवाईत आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली असून विविध राज्यांची दहशतवादविरोधी पथकं आणि एनआयएने संयुक्तरित्या ही कारवाइ केली आहे.

26 जानेवारीला राजपथावर होणारी परेड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फ्रांस चे राष्ट्रपति ओलांद दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. भारतामध्ये पॅरीस आणि जाकार्ताप्रमाणे साखळी हल्ले होण्याचा शक्यता गुप्तचर संस्थांनी वर्तवली आहे. त्यापार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार,  आयसिसच्या 5 सहानुभूतीदारांना कर्नाटकातून तर एका सहानुभूतीदाराला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. हे सर्व आयसिसच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. नजमुल हुडा या केमीकल इंजिनिअरला मंगळुरूमधून तर सय्यद हुसैनला टुमकूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरूमधून कास्मी या मौलवीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईजवळच्या मुंब्रा इथून एक संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.  आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएसने ही संयुक्तपणे कारवाई केली.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2016 01:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...