भारतात 'मन की बात' करणं अत्यंत कठीण - करण जोहर

भारतात 'मन की बात' करणं अत्यंत कठीण - करण जोहर

  • Share this:

karan Johar in Jaipur

जयपूर - 21 जानेवारी : भारतात मन की बात करणं अत्यंत कठीण असल्याचं प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक करण जोहर वक्तव्य केलं आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये लेखिका शोभा डे यांनी घेतलेल्या मुलाखतीत करण जोहरने हे वक्तव्य केलं आहे.

भारतात आपल्या मनासारखी गोष्ट करणं अत्यंत कठीण आहे. कोणतही गोष्ट करायच्या आधी माझ्या मनात सारखी भीती असते की कोणी माझ्याविरोधात एफआयआर तर दाखल नाही ना करणार?र, असं करण म्हणाला. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विनोद आहे, तर लोकशाही त्याहूनही मोठी थट्टा असल्याचंही करण जोहर म्हणाला.

याआधीही आमिर खानने देशात वाढत्या असहिष्णुतेविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आमीरवर जोरदार टीकाही झाली. त्यामुळे आमिर आणि शाहरूख खानच्या पाठोपाठ आता करण जोहर हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 22, 2016, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading