26 जानेवारीची परेड आयसिसच्या टार्गेटवर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2016 11:07 PM IST

26 जानेवारीची परेड आयसिसच्या टार्गेटवर

isis_26janनवी दिल्ली -21 जानेवारी : 26 जानेवारीला राजपथावर होणारी परेड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फ्रांस चे राष्ट्रपती ओलांद हे सीरियातील दहशतवादी संघटना आयसिसच्या टार्गेटवर असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिलीये.

गुप्तचर विभागाने जारी केलेल्या अलर्ट नुसार जगातली सगळ्यात मोठी दहशतवादी संघटना आयसिसने आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. आणि 26 जानेवारी च्या कार्यक्रमावर हल्ला करून मोदी आणि ओलांद यांना ठार करण्याची दहशतवाद्याची योजना आहे. इतकंच नाही तर रेल्वे स्टेशन्सला सुद्धा दहशतवादी टार्गेट करू शकतात अशी IB ची माहिती आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन दिसांपूर्वी दिल्ली लगतच्या नोएडातून एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची निळ्या दिव्याची गाडी चोरीला गेली आहे. दहशतवाद्यानी आपला हेतू साध्य करण्या साठी ही गाड़ी तर चोरली नाही ना अशी भीती सुरक्षा यंत्रणांना आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2016 11:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...