रोहित आत्महत्या प्रकरणः 10 दलित प्रोफेसरांची राजीनामा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2016 11:11 AM IST

रोहित आत्महत्या प्रकरणः 10 दलित प्रोफेसरांची राजीनामा

452351-rohithvemula-hyderabadunive

21 जानेवारी : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणखीन गंभीर होत आहे. मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर विद्यापीठातील 10 प्रोफेसरांनी राजीनामा दिला आहे.

स्मृती ईराणी यांनी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातून ज्यांनी काढलं, त्यामध्ये एक दलित प्रोफेसरही होते. मात्र, ईराणी यांच्या वक्तव्याचा आक्षेप घेत  हैदराबाद विद्यापीठाच्या अनुसूचित जाती, जमातीच्या 10 प्राध्यापकांचा राजीनामा दिला आहे. बंडारू दत्तात्रय याला वाचवण्यासाठीच त्यांनी असं विधान केलं आहे, असा आरोपही प्रोफेसरांनी केला. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत. तसंच आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना आमचा पाठींब असून, आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2016 11:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...