रोहितच्या आत्महत्येविरोधात अशोक वाजपेयींकडून डी. लिट परत

रोहितच्या आत्महत्येविरोधात अशोक वाजपेयींकडून डी. लिट परत

  • Share this:

ASHOK-VAJPEYI

हैदराबाद -20 जानेवारी : हैदराबाद विद्यापीठातील 'पीएचडी'चा विद्यार्थी रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळं व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करत प्रसिद्ध लेखक अशोक वाजपेयी यांनी आपली 'डी-लिट' ही पदवी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. वाजपेयी यांनी ही डिग्री हैदराबाद विद्यापीठातूनच प्राप्त केली होती.

आपण भारतीय जनता आणि समाजाला व्यापक संदेश देण्याच्या उद्देशानंच आपली डी.लिट ही पदवी विद्यापीठाला परत करत असल्याचं अशोक वाजपेयी यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष असलेल्या वाजपेयींनी दादरी प्रकरणानंतर असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा परत केला होता.

रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर हैदराबादसह देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या निषेधार्थ देशभरात विविध विद्यार्थी संघटनांनी निदर्शनंही केली. पण यामुळे रोहितच्या आत्महत्येचं राजकारण होतंय का?, असा सवाल देखील आता विचारला जात आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 20, 2016, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading