हैदराबाद प्रकरणी मोदी सरकार विरोधकांच्या रडारवर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2016 09:43 PM IST

हैदराबाद प्रकरणी मोदी सरकार विरोधकांच्या रडारवर

haidrabad)rgहैदराबाद -19 जानेवारी :हैदराबाद विद्यापीठात दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोदी सरकारला धारेवर धरलंय. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी हैदराबादला जाऊन विद्यार्थी आणि रोहीतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी रोहितच्या निधनाचं दुख व्यक्त करत वेमुला कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यानंतर त्यानी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यापीठात कुणाला काय विचार मांडायचे आहे आणि काय मांडू नये याला स्वातंत्र असायला हवे. जर तुम्हाला त्याचे विचार पटत नसेल  पण त्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू आणि केंद्रीय मंत्री योग्यपद्धतीने काम करत नाही असा आरोपही राहुल गांधींनी केला. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केलाय. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे बंडारू दत्तात्रेय यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केजरीवाल यांनी केली. राहुल गांधींनी तातडीने हैदराबादला भेट दिल्यामुळे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावर टीका केली. ही वेळ रोहीतच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याची आहे. पण राहुल गांधी जखमेवर मीठ चोळण्यासाठी गेले अशी टीका नक्वी यांनी केलीय.

हैदराबाद विद्यापीठाच्या आवारात संचारबंदी लागू

दरम्यान, रोहीत वेमुलाच्या आत्महत्येनंतर हैदराबादमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. विद्यापीठाच्या आवारात जोरदार निदर्शनं केली.  भाजपचे मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या हैदराबादमधल्या घराबाहेरही विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. विद्यार्थी निदर्शनं थांबवत नाहीत हे पाहून आता हैदराबाद विद्यापीठाच्या आवारात संचारबंदी लागू केलीये. त्याशिवाय विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांचं उपोषण सत्याग्रह अजूनही सुरूच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाची 2 पथकं हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरात पोहोचली आहेत. त्यांच्यासमोर विद्यार्थी आपलं म्हणणं मांडणार आहेत. रोहितच्या आत्महत्येनंतर मुंबई, दिल्ली, चेन्नईमध्येही विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. दुसरीकडे बंडारू दत्तात्रेय आणि हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरु यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादेत विद्यापीठ बंद पाडण्याचा प्रयत्न

Loading...

हैदराबादमधल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातले विद्यार्थीही सरसावले आहेत. पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली. पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. तर  राज्यात दलित विद्यार्थ्यांच्या चळवळीचं महत्त्वाचं स्थान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठातही हैदराबादच्या घटनेचे पडसाद उमटलेत. सर्व पक्षाचे विद्यार्थी आंदोलनात उतरलेत आणि त्यांनी विद्यापीठ बंद करायचा प्रयत्न केला. यावेळी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2016 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...