दलित विद्यार्थ्याची आत्महत्या; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2016 02:10 PM IST

दलित विद्यार्थ्याची आत्महत्या; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा

dfalruiewurhy

18 जानेवारी :  हैदराबाद विद्यापीठातून निलंबित करण्यात आलेल्या रोहित वेमूला या दलित विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विद्यापीठाचे कुलगुरू आप्पा राव पोडिले, एबीव्हीपी कार्यकर्ता तसंच त्याच्या भावाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडारू यांनी या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिलं होतं. त्यांच्या पत्रामुळेच रोहित आणि त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यामुळे तो तणावाखाली आला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

रोहित वेमलू (वय 25) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आंबेडकर स्टुडंटस् संघटनेचा सदस्य होता. गेल्याच आठवडय़ात रोहितसह अन्य पाच विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली होती. विद्यापीठाने निलंबित केल्याप्रकरणी या पाच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थी संघटनांनी उपोषण करत निषेध व्यक्त केला होता. आता रोहितच्या आत्महत्येनंतर हे प्रकरण आणखी तापले असून, विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आज बंद पुकारला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी तेलंगणातील दहा विद्यार्थी संघटनांनी उपोषण आंदोलन सुरू केलं असून, विद्यापीठ परिसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.

Loading...

दलित तरुणाची व्यथा : आत्महत्येआधी लिहिलं पत्र

मला व्रूिाानलेखक व्हायचं होतं. पण इथे माणसाची गुणवत्ता त्याच्या जातीवरून ठरवली जाते. मतं आणि पैशापुढे त्याची गुणवत्ता शून्य आहे.माणसाच्या गुणांवरून त्याची परीक्षा केली जात नाही. आत्महत्या करण्याचा निर्णय माझा आहे आणि याला मीच जबाबदार आहे. मी गेल्यावर माझे मित्र किंवा शत्रू, कुणालाही त्रास देऊ नका.आयुष्य हाच एक शाप आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2016 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...