भारत-पाकिस्तानमधली उद्याची चर्चा अखेर लांबणीवर

भारत-पाकिस्तानमधली उद्याची चर्चा अखेर लांबणीवर

  • Share this:

Narendra-Modi_Nawaz-Sharif-81

14 जानेवारी : भारत-पाकिस्तानमधल्या संबंधांमध्ये दररोज नवनवी वळणं येत आहे. दोन्ही देशांतली परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा आता लांबणीवर पडली आहे. आणि पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड मौलाना मसूद अझहर अजून खुलेआम फिरतोय.

शुक्रवारी 15 जानेवारीला नियोजित असलेली भारत-पाकिस्तानमधली सचिवस्तरीय चर्चा होणार नाहीय, हे आता स्पष्ट झालं आहे. पठाणकोट हल्ल्याच्या पाकिस्तानच्या तपासाचं स्वागत केलंय. पण पाकिस्तानवर पूर्ण विश्वास ठेवायला भारत अजून तयार नाही.

जैश-ए-मोहम्मदच्या कार्यालयावर पाकिस्ताननं छापे टाकले. पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीची तयारी दाखवली. पण ही चर्चेची योग्य वेळ नसल्याचं भारताला वाटतंय. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय. हल्ल्याचा मास्टरमाईंड मौलाना मसूद अझहरला ताब्यात घेतलंय की नाही, याबद्दल पाकिस्तानकडून दुजोरा मिळाला नाही.

पठाणकोट हल्ल्याला अनेक दिवस उलटूनही पाकिस्ताननं आतापर्यंत तरी ठोस अशी कोणतीच कारवाई केलेली नाही. मसूदच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदींची शिष्टाई कामी येईल का, हे येणार्‍या काही दिवसांतच कळेल.

Follow @ibnlokmattv

First published: January 14, 2016, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading