मेहबूबा मुफ्ती होणार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री?

मेहबूबा मुफ्ती होणार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री?

  • Share this:

CYGF3oSWQAA0iJu.jpg large

07 जानेवारी : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी मेहबुबा मुफ्ती या मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याची शक्यता आहे. मेहबुबा मुफ्ती काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील.

मुफ्ती महंमद सईद (वय 79) यांचं आज (गुरुवारी) सकाळी एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांच्यावर गेल्या दोन आठवड्यांपासून उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर त्यांच्या मुलीला बसवण्याचा निर्णय पक्षा तर्फे घेण्यात आला आहे.

मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या तर 25 जागा जिंकत भाजप दुसर्‍या क्रमांकावर होता. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी युती करत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं आणि मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण मुफ्ती सईद न्युमोनिया या आजाराने त्रस्त होते. प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे 24 डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तेव्हापासूनच जम्मू-काश्मीरचे नेतृत्व कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता.

दरम्यान, मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनामुळे राज्याचे आणि पक्षाचे मोठे नुकसान झालं असून आता राज्याची सूत्रं त्यांची मुलगी मेहबूबा मुफ्ती यांच्या हातात सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास मेहबूबा मुफ्ती या जम्मू- काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री ठरतील. दरम्यान, ही निवड विरोध करणार नसल्याचे संकेत भाजपने दिलं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Jan 7, 2016 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading