पठाणकोटमध्ये 65 तासांनंतर पुन्हा गोळीबार, शोधमोहीम सुरूच

  • Share this:

Pathankot 31204 जानेवारी : अतिरेकी हल्ल्याला बळी पडलेल्या पठाणकोटमध्ये अजून तणाव कायम आहे. 65 तासांनतर पुन्हा एअरफोर्स स्टेशनमधून गोळीबाराचा आवाज ऐकू आला. एनएसजीनं सहा अतिरेक्यांचा खात्मा केल्याचा दावा केल्यानंतर ही घटना घडली. पण, एअरफोर्स पूर्णपणे सुरक्षित आहे, याची खात्री होईपर्यंत शोधमोहीम सुरूच राहणार आहे.

युनायटेड जिहाद काऊन्सिल नावाच्या काश्मिरी अतिरेकी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. काश्मीरच्या प्रश्नासाठी हा हल्ला केल्याचा दावा या संघटनेनं केलाय. पण भारतानं हा दावा नाकारलाय. हा हल्ला जैश ए मोहम्मदनं केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं भारतानं म्हटलंय. या हल्ल्यात दोन अतिरेकी संघटनांचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

पठाणकोटमध्ये नेमकं काय घडलं ?

- भारत पाकिस्तानच्या सीमेपासून 40 किमी अंतरावर पंजाबमध्ये हवाई दलाचा एअरबेस पठाणकोट

- पाकिस्तानचा बराचसा भाग या एअरबेसच्या अखत्यारित असल्याने क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरचा मोठा साठा कायम तैनात

- या तळावर हवाई दलाचे सैनिक आपल्या कुटुंबियांसोबत राहतात

- 2 जानेवारीला पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं एअरबेसवर हल्ला केला

- दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांना चकवत घुसखोरी केली आणि पोलीस वाहन ताब्यात घेतलं

- दहशतवाद्यांनी गाडीतल्या पोलीस अधिक्षकांसह सगळ्यांना गाडीबाहेर फेकुन दिलं

- पठाणकोट एअरबेसच्या दिशेने जातांना दहशतवाद्यांनी 4 कॉल केले, पहिली 3 कॉल हे जैशच्या नेत्याला तर शेवटचा कॉल वैयक्तिक स्वरुपाचा

-गाडीबाहेर पडलेल्या पोलीस अधिक्षकाने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि दिल्लीपर्यंतची यंत्रणा सतर्क झाली

-टॅपिंगमुळे पठाणकोट हल्ल्याची योजना कळली होती मात्र समन्वयाअभावी नाकाबंदी करून दहशतवाद्यांनी पळवलेल्या गाडीला रोखता आलं नाही

- नेमके किती दहशतवादी आहेत आणि ते कुठे दबा धरून बसलेत याविषयी 48 तासांहून अधिक काळ माहिती नव्हती

- दरम्यान मंत्र्यांकडून दोनदा कारवाई संपल्याचं जाहीर करण्यात आलं आणि पुन्हा गोळीबार सुरू झाल्याचं दिसलं

- पठाणकोटच्या या हल्ल्यात आपण सात अधिकारी गमावले

- 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

- 60 तासांहून अधिक काळ भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांची धुमश्चक्री

- देशातील सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: January 4, 2016, 10:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading