रिलायन्स 'जियो 4 जी सेवे'चा कर्मचार्‍यांपासून करणार शुभारंभ

रिलायन्स 'जियो 4 जी सेवे'चा कर्मचार्‍यांपासून करणार शुभारंभ

  • Share this:

reliance-jio-mobile-phone

27 डिसेंबर : रिलायन्स 4 जी सेवेची प्रतिक्षा आता लवकरच संपणारय. रिलायन्सचे संस्थापक स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांच्या 83 व्या जयंतीचं औचित्य साधून रिलायन्स आपल्या महत्वाकांक्षी जियो 4 जी सेवा आज रविवारी 27 डिसेंबरला लाँच करणार आहे. रिलायन्स आपल्या जियो 4 जी सेवेची सुरुवात आपल्या कर्मचार्‍यांपासून करणार आहे. रिलायन्सच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी जियो 4 जी सेवा ही प्रायोगिक तत्वावर लाँच करण्यात येईल. कमर्शियल लाँच होईपर्यंत रिलायन्सच्या सर्व कर्मचार्‍यांना मोफत 4 जी सेवेचा देणार आहे.

आज रविवारी नवी मुंबईतील रिलायन्सच्या ऑफिसमध्ये कर्मचार्‍यांसाठी प्रायोगिक तत्वावर 4 जी सेवा लाँच होणार आहे. या सोहळ्याला रिलायन्स जियोचा ब्रँड ऍम्बेसेडर अभिनेता शाहरुख खान उपस्थित असणार आहे. तसंच या कार्यक्रमाला प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान उपस्थित राहणार आहे. प्रायोगिक तत्वावर कर्मचार्‍यांसाठी कमीत कमीत 70 हजार कनेक्शन देण्यात येईल. याच कनेक्शनमध्ये वाढ करुन ही संख्या 1 लाखापर्यंत नेण्यात येईल.

50 पेक्षा अधिक शहरांमध्ये असणार रिलायन्सचे हॉट स्पॉट

रिलायन्स जियो मोठ्या प्रमाणावर आपली 4 जी सेवा सुरू करणार आहे. त्यासाठी देशभरातील 50 शहरांमध्ये ग्राहकांसाठी हॉट स्पॉट लावण्यात आले आहे. त्यामुळे 4 जी डाटा कनेक्टींगसाठी ग्राहकांना अडचण येणार नाही.

रिलायन्स जियो करणार भारताचं डिजिटालाईजेशन

भारतात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी रिलायन्सने पूर्ण तयारी केली आहे. याच कारण म्हणजे, रिलायन्स जियोकडे पूर्ण देशात स्पेक्ट्रम आहे. संपूर्ण देशात तब्बल 2.5 लाख किलोमिटरपर्यंत फायबर ऑप्टिक्सचं जाळ आहे. त्यामुळे देशात तुम्ही कुठेही असला तरी नेटवर्क हे एकसारखच मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

First published: December 26, 2015, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading