केजरीवालांनी राजकारणात असभ्यपणा आणला, जेटलींचं टीकास्त्र

  • Share this:

jetliy on kejriwal25 डिसेंबर : असभ्यपणा हा भारतीय राजकारणाचा नवा मूलमंत्र झालाय का? नसावा, अशी मला आशा आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि बाहेर पंतप्रधान आणि इतरांबद्दल केलेल्या विधानांबद्दल काय? असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय. असभ्यपणा हा त्यांचा हक्क नाही. अशा भाषेमध्ये राजकीय चर्चा होऊ शकत नाही. राजकारणामध्ये सार्वजनिक चर्चेरम्यान विद्रूप भाषेच्या वापराला उच्चस्थान मिळू शकत नाही अशा शब्दात जेटलींनी आपल्या ब्लॉगमधून केजरीवालांवर टीका केलीये.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर केलेल्या आरोपांदरम्यान तिखट भाषा वापरली होती. त्यामुळे जेटली संतप्त झाले आहेत. अशा भाषेमुळे केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या अन्य नेत्यांनी सार्वजनिक चर्चेचा दर्जाच खालावला आहे अशी टीका जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केली आहे. जेटली यांच्या फेसबुक पेजवर हा ब्लॉग प्रसिद्ध झालाय. सरकारमधल्या उच्च पदस्थांना असभ्य भाषा वापरण्याचा अधिकार नसतो असंही जेटली यांनी सुनावलंय. गेल्या काही दिवसांपासून डीडीसीएमधल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी जेटली यांना लक्ष्य केलंय. त्यामुळे ते संतापले आहेत.

अरूण जेटली म्हणतात...

"असभ्यपणा हा भारतीय राजकारणाचा नवा मूलमंत्र झालाय का? नसावा, अशी मला आशा आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि बाहेर पंतप्रधान आणि इतरांबद्दल केलेल्या विधानांबद्दल काय? भारत सरकारमधल्या एखाद्या उच्चपदस्थानं अशी भाषा वापरल्यास देशभरात प्रक्षोभ उसळेल. उच्च पदावर असलेल्यांनी संयमाने वागणे अपेक्षित आहे. ते विचित्र भाषा वापरू शकत नाहीत.

असभ्यपणा हा त्यांचा हक्क नाही. अशा भाषेमध्ये राजकीय चर्चा होऊ शकत नाही. राजकारणामध्ये सार्वजनिक चर्चेरम्यान विद्रूप भाषेच्या वापराला उच्चस्थान मिळू शकत नाही. दिल्ली सरकारच्या उच्चपदस्थांमुळे राजकीय चर्चेचा स्तर खालवला आहे. माहिती देताना ते खोटेपणाचा वापर करतात. दिल्लीमध्ये 'आप'च्या यशामुळे काँग्रेसचा असा गैरसमज झाला आहे की असभ्यपणामुळे मतं मिळतात. मात्र, भारतीय समाजमनाला प्रामाणिकपणा भावतो. सार्वजनिक चर्चेची पातळी खालवल्याबद्दल जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटायला हव्यात."

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2015 09:32 AM IST

ताज्या बातम्या