दिल्लीत सम विषम क्रमाकांच्या वाहनांची 1 जानेवारीपासून अंमलबजावणी

दिल्लीत सम विषम क्रमाकांच्या वाहनांची 1 जानेवारीपासून अंमलबजावणी

  • Share this:

delhi odd even car24 डिसेंबर : अखेर केजरीवाल सरकारने सम विषम क्रमाकांच्या वाहनांबाबत सोमवारी परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकानुसार सम तारखेला सम क्रमांकाच्या गाड्या आणि विषम तारखेला त्या क्रमाकाच्या गाड्या दिल्लीच्या रस्त्यावर असणं बंधनकारक आहे. सोमवारपासून ही समविषम क्रमांकाची अधिसुचना लागू होईल.

आठवड्यातील रविवार सोडला तर बाकी दिवशी हा नियम लागू असेल.त्याप्रमाणेच पाकीर्ंगची व्यवस्था असेल. त्यात एखादी स्त्री आणि तिच्यासोबत 12 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना या नियमांमधून सुट देण्यात आली आहे.

शिवाय सीएनजी गाड्यांनाही सूट देण्यात आली आहे. अधिसुचनेनुसार नियम तोडणार्‍यांना 2000 रुपये दंड ठोठावण्यात येईल. दिल्ली मुख्यमंत्र्यासह सर्व लाल दिव्याच्या गाड्यांनाही हा नियम लागू नसेल. सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत हा नियम लागू असेल त्यानंतर या नियमामधून वाहनांना सूट मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

First published: December 24, 2015, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading