बालगुन्हेगारी विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा

बालगुन्हेगारी विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा

  • Share this:

child crime22 डिसेंबर : निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी मोकाट सुटल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अत्याचार करून केवळ अल्पवयीन असल्याने संरक्षण मिळण्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बाल गुन्हेगार न्याय विधेयकात सुधारणा करण्यात येणार आहे. यासंबंधीचं 'बालगुन्हेगारी कायदा 2015 विधेयक ' आज राज्यसभेत मांडण्यात येईल.

सर्वपक्षीय सदस्यांनी हे विधेयक मांडण्याची मागणी सरकारकडे केली आहे. हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालेलं आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयानं हे विधेयक लोकसभेत मांडलं होतं. दरम्यान, सकाळी साडे आठ वाजता निर्भयाचे आईवडील संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची भेट घेणार आहेत.

या नव्या विधेयकात नेमकं काय असणार आहे ?

- नवा कायदा जुव्हेनाईल जस्टीस कायदा, 2000 ची जागा घेणार

- नव्या कायद्यात निर्घृण गुन्ह्यांमध्ये 16 ते 18 वयोगटातल्या आरोपींना प्रौढांसाठीचे कायदे लागू होणार

- निर्घृण गुन्ह्यांची व्याख्या काय आहे, तर ज्या गुन्ह्यांची शिक्षा 7 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा सर्व गुन्ह्यांना हा कायदा लागू होईल

- ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेत असाच कायदा आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2015 08:57 AM IST

ताज्या बातम्या