अरुण जेटलींचा केजरीवालांवर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

अरुण जेटलींचा केजरीवालांवर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

  • Share this:

jetliy on kejriwal21 डिसेंबर : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आम आदमी पक्षाच्या नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. दिल्ली हायकोर्टात जेटलींनी 10 कोटींचा दाखला दाखल केला.

आपनं काही दिवसांपूर्वी दिल्ली क्रिकेट असोसिएनशनवरून जेटलींवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले होते. जेटली डीडीसीएचे अध्यक्ष असताना तिथे अनेक गैरव्यवहार झाले, आणि त्यामुळे त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी जेटलींची आहे, असं आपचं म्हणणं आहे. तर भाजपनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

विशेष म्हणजे, भाजपचे खासदार किर्ती आझादही दिल्ली क्रिकेट असोसिएनशनवर गंभीर आरोप केले होते.डीडीसीएमध्ये अनेक गैरव्यवहार झाले आहेत. ज्या कंपन्यांना कंत्राटांसाठी पैसे देण्यात आले, त्यांचे पत्ते खोटे आहेत, आणि काही कंपन्याच बोगस आहेत, त्या अस्तित्वातच नाहीत, असा आरोप आझाद यांनी केला. मी मोदींचा फॅन आहे. माझं अरुण जेटलींशी कोणतही वैर नाही. मला फक्त भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचंय, असंही आझाद म्हणाले होते. त्यामुळे भाजप आता किर्ती आझाद यांच्यावर काही कारवाई करते का हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2015 02:06 PM IST

ताज्या बातम्या