निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आज सुटणार?

निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आज सुटणार?

  • Share this:

juvenile Released

20 डिसेंबर : दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार आज सुटणार आहे. दिल्लीच्या महिला आयोगाने ही सुटका रोखण्यासाठी शनिवारी रात्री उशीरा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणाची सुनावणी सोमवारी करण्यात येईल असं कोर्टाने स्पष्ट करत अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यासही नकार दिला. त्यामुळे आज निर्भयाच्या अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका होणार आहे.

दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी काल (शनिवारी) रात्री उशिरा गुन्हेगाराच्या सुटकेविषयी फेर विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यासाठी सरन्यायाधीशांच्या निवास्थानी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टात रजिस्ट्रारांची भेट घेतली आणि यांसदर्भातील महत्वाची कागदपत्रं सादर केली असल्याची माहिती स्वाती मालीवाल यांनी दिली. मध्यरात्री एकच्या सुमारास स्वाती मालिवाल यांची याचिका सुप्रीम कोर्टाने मंजूर केली. पण दोषीच्या सुटकेला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. तसंच या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी होईल असं स्पष्ट केलं.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव या गुन्हेगाराला बालसुधारगृहातून दुसर्‍या जागी हलविण्यात आलं आहे. त्यामुळे त्याची आज सुटका होणार की नाही, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 20, 2015, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading