S M L

गुगलची भारताला भेट, 2016 पर्यंत 100 रेल्वे स्थानकं वाय-फाय !

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2015 09:27 PM IST

गुगलची भारताला भेट, 2016 पर्यंत 100 रेल्वे स्थानकं वाय-फाय !

16 डिसेंबर - भारतातील 100 स्थानकं वाय फायच्या मदतीने लाईव्ह करणार अशी घोषणा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केली. सुंदर पिचाई हे आजपासून भारत दौर्‍यावर आहेत. गुगलच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यापासूनची त्यांचा हा भारतातील किंबहूना आंतरराष्ट्रीय पहिला दौरा आहे.

या दोन दिवसीय दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी, पिचाईंनी त्यांच्या भाषणातून भारतासाठी अनेक योजना जाहीर केल्या. गुगलच्या या योजना लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबई सेंट्रल हे स्थानक जानेवारी 2016 पर्यंत पूर्णपणे वाय-फाय सुविधेनं सज्ज होणार आहे. "भारताने मला व गुगलला बरंच काही दिलं आहे. त्यामुळे आशा करतो की, मी ही या देशाला खूप काही देऊ शकेन" असंही पिचाई म्हणाले.

पिचाई यांच्या भाषणातील ठळक मुद्दे1- 2016 संपेपर्यंत भारतातील 100 स्थानकं वाय फायच्या मदतीने लाईव्ह होणार

2- गुगल लवकरच नवीन लोकांना भरती करणार आहे

3- गुगलचे नविन कॅम्पस लवकरच हैद्राबादमध्ये बनणार

Loading...
Loading...

4- भारतातील 2 अब्ज डेव्हलपर्सना गुगल प्रशिक्षण देणार

5- सर्वांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याचा गुगल करणार प्रयत्न

6- ' बायसिकल फॉर वुमन' या योजनेचा प्रसार वाढवणार

7- प्रोजेक्ट लून लवकरच भारतात आणणार

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2015 09:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close