दिल्लीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2015 12:46 PM IST

rape-victims-

13 डिसेंबर : दिल्लीतील तिगरी भागात शनिवारी सायंकाळी एका सात वषच्य अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील तिगरी भागातील पार्कमध्ये ही मुलगी खेळत असताना तिचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या प्रकरणी एक आरोपीला अटक करण्यात आली असून, अन्य दोघे फरार आहेत. या मुलीची प्रकृती गंभीर असून तिला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीत सामुहिक बलात्काराच्या घटना सतत घडत असून, गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी नजफगड भागात 14 वषच्य मुलीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार केला होता.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2015 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...