तिशीत असूनही रिटायरमेंट दूर वाटतेय का ? पुन्हा विचार करा

तिशीत असूनही रिटायरमेंट दूर वाटतेय का ? पुन्हा विचार करा

  • Share this:

एक चांगली नोकरी,आपल्या कक्षा आणि कर्तव्य सांभाळतांना या स्पर्धच्या युगात आजच्या तरूणाईला या महागाईचा सामना करणे अशक्यप्राय झाले. त्याचे परिणाम असे की, जेव्हा जीवनशैलीची देखरेख आणि भविष्यासाठी पैसा साठवण्यामध्ये संतुलन राखावं तर बचत राहुन जाते.

कोणत्याही तरूण एक्झिक्यूटिव्हसाठी त्याच्या वयाच्या पन्नाशी नंतरच्या आयुष्याचा विचार करणं कठीण असते. असं वाटत की ही खूप दूरची गोष्ट आहे. पण ही दूरची गोष्ट वाटली तरी, तथ्य हे आहे की वास्तवात आपण त्याकडे  दुर्लक्षित करतो. मान्य आहे की, अबलंबन करण्यासाठी वेळ लागतो पण ह्या ही गोष्टीचा आपण विचार करायला हवा.

बचतसाठी योग्य वेळेचे महत्त्व

गोष्ट दोन एक्सिक्यूटिव्ह्सची ज्यांनी दहा वर्षांसाठी काही निक्ष्चित रक्कम साठवली. फरक इतकाच की एकाने 25 वर्षाच्या वया पासून सेविंग सुरु केली तर दुस¬याने 35 व्या वर्षी. सेव्हिंगची रक्कम समान असल्याने आधी वाटतं की, दोघांनी समान रक्कम सेव केली असावी. पण इथे काम करते चक्रवाढ व्याजाची ताकद. ज्या व्यक्तिने पहिले ही बचत सुरु केली, त्याने 60 वर्षांचा होईपर्यंत तुलनात्मक प्रमाणात जास्त रक्कम जमा केली. उदाहरणार्थ एक व्यक्ति वयाच्या 25 वर्षांपासून दर वर्षाला 50 हजार रुपये जोडतो. 10 टक्के प्रति वर्षच्या दराने तो 8 लाख रुपये जमवतो व त्यानंतर तक्रवाढ व्याजासाठी ठेवून देतो. त्याच वार्षिक रिटर्नवर तो 60 नर्षांचा झाल्यावल 90 लाख रुपये मिळवेल. तर दुसरीकडे समान वार्षिक रिटर्नवर समान ठेव जमा करणा¬या त्या व्यक्तिला, ज्याने 35 व्या वर्षी सुरु केलं, त्याला मिळतील 54 लाख रुपये. म्हणजे समजलात ना तुम्ही ?sonakshi

चांगली गोष्ट अशी की आज फायनेंशियल प्लॅनिंग अशी माध्यमं उपलब्ध आहेत जिथे एक रिटायरमेंट अकाउंट चालू करुन असं करता येऊ शकतं. प्रत्येक वषी फक्त 30000 रुपये वाचवून पण रिटायरमेंटसाठी मोठी रक्कम साठवू शकता.

या वर्गात उपलब्ध असलेला एक चांगला प्लान एचडीएफसी लाइफ क्लिक 2 रिटायर प्लान. रहाण्या खाण्याचा वाढता खर्च, महागाई, पुढील आयुष्याला लक्षात ठेऊन हे प्रोडक्ट तुमची अशी मदत करतं की  तुम्ही रिटायरमेंटवर हव्या असलेल्या रकमेच्या हिशोबाने अथवा वर्तमानात प्रत्येक  वर्षी बचतीच्या तुमच्या क्षमतेच्या आधारावर गुंतवणूकीची योजना बनवू शकता. याला अजून स्पष्टपणे समजून घेण्यासाठी हा ब्रोशर बघा.

वयासोबत खर्च वाढणारच.

तुमची व्यावसायिक पदवी , होम लोन, मुलांसाठी शिक्षण प्लॅन सारखं रिटायरमेंटची प्लॅनिंग पण एक खर्चच आहे. ही एक गुंतवणूक जेणेकरून भविष्यात तुम्हाला पैश्यांची कमी भासणार नाही. जास्त करून तरूण एक्झिक्यूटिव्ह त्यांच्या रिटायरमेंटसाठी बचट करत नाहीत, कारण त्यांना वाटतं की हे नंतरही होऊ शकतं. पण लक्षात ठेवा की नंतर काही होत नाही. मेट्रो शहरात राहणा¬या तुमच्या कोणत्याही मित्राला विचारा की मुलांचा शाळेचा व घराचा खर्च किती होतो. तुम्हाला वास्तवाची जाणीव होईल.

बचतीशिवाय हा ही सल्ला दिला जातो की तुमच्या तीन ते सहा महिन्यांची खर्चाची रक्कम, ज्यात ईएमआय चा पण समावेश असेल, त्याला इमरजंसी फंडच्या रूपात ठेवताआला पाहिजे. नविन गाडी घेण हे बचतीपासून वाचण्याचं कारण नाही असू शकतं.

उत्पनातून बचत करण्याचं गणित

बोनस किंवा पगार वाढ अनेकदा पुढील सुट्ट्यांमध्ये किंवा मोठ्या भेटींच्या खरेदित खर्च होतात. त्यापेक्षा प्रयत्न करा की होम लोन किंवा शिक्षण कर्जाची परत फेड करा. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की, अनेक गोष्टी जशा की भाडे, पेट्रोल दर सतत वाढत असल्याने आपल्या खर्चातील मोठा हिस्सा यात खर्च होतो.  अर्थात हे खरं आहे की छोटं छोटं योगदानचे पण मोठ्या काळानंतर एका मोठ्या साठ्यात रूपांतर होते. पण याला फक्त पहिली पायरी मानायला हवी. या व्यतिरिक्त ज्यांचा स्वतःचा व्यवसाय व फर्म आहे व ज्यांच्याकडे नियमीत आयचे साधन नाही, त्यांच्याकडे शिस्त हा एकमेव पर्याय उरतो. रिटायरमेंटसाठी केली जाणारी मासिक बचत ही तुमच्या मासिक वेतनाचा 10 टक्के हिस्सा असला पाहिजे जेणेकरून नंतर पैश्यांच्या कमीला सामोरे जावे लागणार नाही. वार्षीक बोनस किंवा टॅक्स रिफन्ड पण आर्थिक नियोजनासाठी चांगला बूस्टर होऊ शकतो. आजच्या काळात प्रत्येक महागड्या वस्तूची किंमत ईएमआयमध्ये बदलली आहे. आज घर खरेदीसाठी, फिरण्यासाठी, कार खरेदीसाठी तसेच उच्च शिक्षणासाठी लोन सहज मिळतं. परंतु रिटायरमेंट नंतर कोणतीही बँक तुम्हाला लोन देणार नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 10, 2015, 1:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading