बॉम्बस्फोट प्रकरणी कोणालाही अटक नाही

बॉम्बस्फोट प्रकरणी कोणालाही अटक नाही

14 फेब्रुवारीपुणे बॉम्ब स्फोटाबाबतची ठोस माहिती उद्यापर्यंत पुढे येईल, असा विश्वास पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केला आहे. कोणीही ताब्यात नाही स्फोटप्रकरणी अजून कुणालाही ताब्यात घेतलेले नाही. स्फोटामागे कुणाचा हात आहे हेही अजून पुढे आलेले नाही. शिवाय स्फोटाबाबत कुठलीही नेमकी गुप्तचर माहिती मिळाली नव्हती, अशी माहिती सत्यपाल सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. स्फोटाविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास (020) 26126296, 26122880 या नंबरवर कळवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तपास वेगानेया बाँबस्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी देशातील सर्व तपास यंत्रणा वेगाने काम करत आहेत. स्फोटाचा मुख्य तपास एटीसकडे असला तरी एनआयए, आयबी, सीबीआयसह लष्करी गुप्तचर संस्थाही एटीएसला मदत करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयही या तपासावर विशेष लक्ष ठेवून आहे. 26/11 पूर्वी झालेले स्फोट आणि पुणे स्फोटात काही साम्य आहे का याचा तपासही एटीएस करत आहे.मृतांची ओळख पटलीदरम्यान बॉम्बस्फोटातील सर्व मृतांची ओळख पटल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मृतांची नावे पुढीलप्रमाणे- 1.अंकित धर - वय 24 वर्ष - कोलकाता2. आनंदी धर - वय 19 वर्ष - कोलकाता3. पी.सुंदरी - वय 22 वर्ष - बंगलोर4. विनीता बदानी - वय 22 वर्ष - मुंबई5. शिल्पा गोएंका - वय 23 वर्ष - कोलकाता6. शंकर पानसरे - वय 40 वर्ष, वेल्हा, पुणे7. गोकुळ नेपाळी - जर्मन बेकरीचा वेटर8. नादिया मॅकरिन - वय 37 वर्ष - इटली9. सईद अब्दुल खली - 38 वर्ष - इराणजखमी 60दरम्यान स्फोटातल्या जखमींची संख्या 60 असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापैकी 19 जखमींना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे. जखमींमध्ये 5 इराणी, 2 येमेन येथील, 2 नेपाळी, 1 तैवान आणि 1 जर्मन नागरिकाचा समावेश आहे.तपास पूर्ण झाल्याशिवाय कोणताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सकाळीच पुण्यात म्हटले आहे. हा हल्ला म्हणजे गुप्तचर संस्थांचे अपयश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या दोन दिवसांतील पोलिसांच्या तैनातीचा परिणाम पुण्यातील सुरक्षेवर झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. देशात हाय अलर्टपुण्यातील बॉम्बस्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन्स, एअरपोर्टस, आण्विक केंद्रे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेषतः मुंबई आणि दिल्लीत पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. मुंबईतील सर्व हॉटेल्स आणि भाभा अणु संशोधन केंद्रात पोलिसांचा पहारा कडक करण्यात आला आहे. लष्कर ए तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडलीने भेट दिलेल्या देशातील शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोलकात्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत टेस्ट मॅच सुरू आहे. त्या ठिकाणीही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गृहमंत्रालयाची बैठकपुणे स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाची आपत्कालीन बैठक झाली. स्फोटासंदर्भातील माहिती गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधानांना सादर केली. पुण्यातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, कानपूर, इंदूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2010 02:21 PM IST

ताज्या बातम्या