चेन्नई झाली जलसागर, पूरस्थिती कायम;आतापर्यंत 269 बळी

चेन्नई झाली जलसागर, पूरस्थिती कायम;आतापर्यंत 269 बळी

  • Share this:

chennai raoin403 डिसेंबर : अवघी चेन्नई जलमय झाली आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झालीये. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून लोकांना अतोनात हाल होत आहे. रस्ते,रेल्वे आणि हवाई वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे लाखो प्रवाशी अडकून पडले आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीये. निसर्गाच्या तडाख्यामुळे अवघी चेन्नई थांबलीये. आतापर्यंत या पावसाच्या हाहाकारात 269 लोकांचा बळी गेलाय.

मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

चेन्नईच्या विविध भागांमध्ये एनडीआरएफनं 30 टीम्स आणि 110 मोटरबोट्स तैनात केल्या आहे. आतापर्यंत हवाई दलानं 200 पेक्षा जास्त लोकांना पुराच्या वेढ्यातून वर उचललं आहे आणि त्यांना हैद्राबादच्या बेगमपेठ रेल्वे स्टेशनवर सुरक्षित पोहोचवलं आहे. तांबरम आणि अराक्कोणम् एअरबेसवर 300 प्रवासी ताटकळले आहेत. लष्करानं शंभरपेक्षाही जास्त मदत छावण्या सुरू केल्या आहेत. चेन्नई जवळच्या राजाली नगरमधल्या अराक्कोरम या नौदलाच्या तळावर विमानं उतरत आहेत. पण अजूनही शहराचे अनेक भाग पाण्याखाली गेलेत आणि वीजपुरवठा खंडीत झाला आहे. हवामान खात्यानं पुढच्या एक आठवड्यात आणखी पावसाचा इशारा दिला आहे.

फक्त हतबलता

चेन्नईसारख्या धावत्या शहराची काय अवस्था झाली आहे. घरं असो किंवा शाळा.. कार्यालयं असोत किंवा मैदानं..सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय. निसर्गापुढे माणून किती हतबल आहे, हे यावरून पुन्हा सिद्ध होतंय. लाखो लोक आपल्या घरांमध्ये अडकले आहेत. घरातलं पाणी, धान्य सगळं संपत आलंय. नवीन सामान आणायची सोय नाही. घरात कुणी आजारी असेल तर त्या व्यक्तीला डॉक्टरकडे न्यायची सोय नाही. सगळीकडे फक्त हाहाकार...लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्या हालांना तर सीमा उरलेली नाही. आता हातात आहे ते फक्त प्रतीक्षा करणं..पाणी कधी ओसरेल याची.. तोपर्यंत निसर्गाचं हे तांडव फक्त बघत रहायचं..

लष्कर आणि हवाई दलाची चोख कामगिरी

या संकटात पुन्हा एकदा लक्षणीय कामगिरी बजावतायत ते लष्कर आणि हवाई दलाने...दक्षिण पश्चिम चेन्नईमधल्या तांबरम हवाई तळावरून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे. तांबरम हा आता हवाई दलाचा बेस बनलाय. फुड पॅकेटस् इथून विमानांमध्ये टाकून विमानं उड्डाण करतायत. यात उल्लेख केला पाहिजे तो या विमान आणि हेलिकॉप्टर पायलटस्‌चं.. कारण एका ठिकाणी विमान स्थिर ठेवणं हे दिसतं तेवढं सोपं नाही.

चेन्नई विमानतळ 6 तारखेपर्यंत बंद

चेन्नई विमानतळ....एरवी दिवसाला शेकडो उड्डाणं हाताळणारं हे विमानतळ आता 6 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. दक्षिण भारतातल्या सर्वात मोठ्या विमानतळांपैकी हे एक...पण रनवेवर पाणी आहे. टॅक्सीवेवरही पाणीच पाणी.. त्यामुळे विमानं उडवणं अशक्य झालंय.

जवळपास 3500 प्रवासी आणि 40 विमानं चेन्नई विमानतळावरच अडकली आहेत. त्यामुळे आता चेन्नईपासून 70 किलोमीटरवर

असलेल्या आरोक्कोणम इथं नौदलाचा एक तळ नागरी विमानतळ म्हणून वापरण्यात येत आहे. काल एअर इंडियानं हवाई दलाच्या मदतीनं इथे एक नागरी विमान उतरवून पाहिलं ही चाचणी यशस्वी झाली. आराक्कोणम विमानतळ वापरात आल्यामुळे औषधं आणि इतर जीवनावश्यक गोष्टी चेन्नईत पोहोचण्यासाठी मदत होतेय.

अभिषेक बच्चनही अडकला

अभिनेते अभिषेक बच्चन सध्या चेन्नईत आहेत. अभिषेकनं फुटबॉल टीम विकत घेतलीय आणि त्याच टीमच्या सामन्यासाठी तो चेन्नईत गेले होते. पण पूर आला आणि विमानतळ बंद झाला. त्यामुळे तो मुंबईला परतू शकत नाहीये. "मी सुरक्षित आहे. काळजीचं काहीही कारण नाही, ज्यांना पुरामुळे त्रास होतोय, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो" असं त्यानं ट्वीट केलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2015 01:49 PM IST

ताज्या बातम्या