Elec-widget

काँग्रेसचा थेट वार

काँग्रेसचा थेट वार

12 फेब्रुवारीअखेर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाटी गेल्यानेच सेनेला आंदोलनासाठी बळ मिळाले, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. राहुल गांधींच्या मुंबई दौर्‍यापासूनच या दोन्ही पक्षामध्ये धुसफूस सुरू होती. औरंगाबादमध्ये पक्षाच्या मेळाव्यात बाळासाहेबांवर टीका करणार्‍या पवारांनी त्याच दिवशी संध्याकाळी 'मातोश्री' गाठली. तब्बल 2 तास या दोघांची चर्चा झाली. या भेटीत आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळू द्यावे म्हणून बाळासाहेबांना साकडे घातल्याची माहिती मीडियाला देण्यात आली. पण या भेटीनंतर शिवसेना आक्रमक झाली. आणि 'माय नेम इज खान' विरोधात 'राडा' सुरू झाला. यानंतर सेनेच्या 3 आमदारांचे पोलीस संरक्षण काढून घेत काँग्रेसने सेनेला झटका दिला. तसेच सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंचेही संरक्षण काढून घेण्याचा इशारा दिला. पण यादरम्यान अगदी राहुल यांच्या दौर्‍याच्या वेळीही ज्यांच्याकडे गृहखाते आहे, त्या राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटील यांना दूरच ठेवण्यात आले. आणि ठाकरे-पवार भेटीवरून पवारांवर जोरदार टीका करण्यात आली.यानंतर 'कोणाचेही संरक्षण काढून घेतले जाणार नाही' अशी हमी काल आर. आर. यांनी दिली. त्यातून आता दोन्ही काँग्रेसमधील हा वाद रंगणार असल्याचे संकेतच मिळाले. त्यामुळे आज सिनेमा रिलीजवरून शिवसेनेने सुरू केलेल्या गोंधळाला आळा घालण्याऐवजी सत्ताधारी काँग्रेसमध्येच लाथाळी सुरु झाल्याचे चित्र समोर आले आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2010 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...