असहिष्णुतेवर आज संसदेत चर्चा, गदारोळ होण्याची शक्यता

  • Share this:

parliament of india general

30 नोव्हेंबर : देशभर सध्या असहिष्णुतेचा मुद्दा गाजत आहे. याच विषयावर आज (सोमवारी) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये विरोधक सरकारवर आरोपांचा भडिमार करणार यात शंका नाही. त्यावर सरकार कसं उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन 26 तारखेला सुरू झालं. मात्र आज (सोमवारी) पासून सत्ताधारी पक्षाची खरी परीक्षा सुरू होईल, कारण विरोधकांच्या आरोपांचा सामना आज सत्ताधार्‍यांना करावा लागणार आहे. विरोधकांक़डून आज संसदेत महागाई आणि असहिष्णूतेच्या मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा आठवडा कठीण असणार आहे.

सहिष्णुतेच्या मुद्यावर देशभरात अनेक आंदोलने होत आहेत. 'पुस्कार वापसी'चं आंदोलन त्यापैकी एक आहे. सरकारने यावर आत्तापर्यंत देशात असहिष्णुता नसल्याचं म्हटलं आहे. आता आज संसदेमध्ये असहिष्णुतेवर चर्चा होणार असल्याने सभागृहात सरकार आपली भूमिका कशी मांडते ते महत्वाचं ठरेल. तसंच सरकारला घेरण्यासाठी विरोधक त्यांचा मुद्दा कसा मांडतात हेही पाहावं लागेल.

त्याचबरोबर या अधिवेशनात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) दुरुस्ती विधेयकाच्या मुद्द्यावर जोर धरण्याचा केंद्राचा विचार आहे. सरकार जीएसटी बिलाला एकमताने पुढे आणण्याच्या विचारात असल्याचं संसदीय कामकाज मंत्री वेंकैया नायडू यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2015 09:27 AM IST

ताज्या बातम्या