S M L

फक्त 2000 मध्ये बदलेलं तुमचं आयुष्य

Samruddha Bhambure | Updated On: Nov 19, 2015 04:50 PM IST

फक्त 2000 मध्ये बदलेलं तुमचं आयुष्य

19 नोव्हेंबर :  जगातील सर्व्हे आणि ट्रेड एनालिस्ट यांच्या दाव्यानुसार जर पाहिलं तर, आज भारतीय तरुणाई आतापर्यंतच्या सर्वात सुवर्ण युगात काम करत आहे. आता करिअर करण्यासाठी इंजिनियरिंग आणि मेडिकलच्या पदवीची गरज फारशी भासत नाही. जी सुरुवातीच्या काळात होती. आता तर एका क्लिकवर जगभरातील माहिती आणि व्यापार करण्याची आयडिया मिळते. दुसरीकडे पाहिलं तर डिजिटल इकोनॉमी लोकांच्या खर्च करण्याच्या सवयी बदलत आहे. जर स्मार्ट फोन घ्यायचा असेल किंवा कार खरेदी करायची असले तर एका क्लिकवर आज तुम्ही सहज खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या फक्त 2000 रुपये प्रतिमहा खर्चावर तुम्हाला 2000 च्या मोबद्दल्यामध्ये जास्त नफा मिळवून देऊ शकतात.

1) फेसबुक - आपण दिवसभर फेसबुकसोबत जोडलेलो असतो. पण, याच फेसबुकच्या जागी काही मासिकं आणि वृत्तपत्रांचा प्रतिमहा हिशेब पाहिला तर 2000 रुपयांपेक्षा कमी खर्च केला, तर आपण जगभरातील माहिती मिळवू शकते. उदाहरणार्थ, 100 रुपये देऊन एखाद्या मासिकाचं सभासद होणे.

2) रिटायरमेंट प्लॅन - रिटायरमेंट प्लॅन म्हणजेच निवृत्तीनंतरच नियोजन तुम्ही काय करणार असा प्रश्न कुणी विचारला तर इतक्या लवकर कशाला असा प्रश्न आपल्या पडतो. पण, विमा क्षेत्रात याचा मार्ग आणखी सुकर केलाय. आपण HDFC Life Click 2 Retire प्लॅनने नियोजन आणखी सोप्या पद्धतीने करू शकता. HDFC Life Click 2 Retire हा एक ऑनलाईन पेन्शन प्लॅन आहे. जो 18 वर्षांपुढील व्यक्तींसाठी आहे. HDFC Life Click 2 Retire चा प्लॅन हा रेग्युलर, लिमिटेड पे आणि सिंगल पेच्या आधारावर उपलब्ध आहे. जो टॅक्समध्ये सूट देतो आणि मार्केटशी संबंधीत सर्व माहितीही पुरवतो. मार्केटमधील वाढ आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम ही सेक्शन 10 (10डी) नुसार टॅक्समुक्त आहे. जर लाइफ इंश्योरेंस कव्हर वर्षाला जमा केलेल्या रक्कमेवर 10 टक्क्यांपेक्षा जास्त नाही तर तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळणार नाही आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर त्यावर टॅक्स पण घेतला जाईल. जर तुम्ही 2000 रुपये प्रतिमहा

प्लॅननुसार जमा केले तर तुमचा एक चांगला रिटायरमेंट प्लॅन तयार होईल.

Loading...

3) थोडं ऑनलाईन ओपन कोर्सबद्दल : अलीकडे मैसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सस (MOOCs) हे लोकप्रिय होत आहे. उच्च शिक्षण आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे फारसं कुणी ऑनलाईन कोर्सकडे लक्ष देत नाही. पण, ऑनलाईन ओपन कोर्स (MOOCs) द्वारे आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि सोबतच प्रमाणपत्रही मिळले. ऑनलाईन कोर्स मुळात मोफत असता.त्यामुळे त्याकडे फारस कुणी लक्ष देत नाही. तर ऑनलाईन ओपन कोर्सस (MOOCs) मध्ये पैसे भरल्यामुळे लोकांना कोर्सचं गांभिर्य कळतं. कोर्ससाठी पैसे भरल्यामुळे अभ्यासाबद्दल गांभिर्य निर्माण होतं. हा कोर्स तुमच्या करिअरला उभारी देण्यास फायदेशीर ठरणारा आहे. आपण स्टाक सोशलचा पॅकेज 29 डॉलर अर्थात भारतीय मुल्यात 1900 रुपये खर्च करून वेब डेव्हलपरही बनू शकता.

sdaaspy

4) फिटनेसबद्दल - प्रकृती चांगली असणं हे गरजेच आहे. यासाठी आपण कोणत्याही उपक्रमात सहभागी होऊ शकता. दिल्ली, बंगळुर, मुंबई सारख्या शहरांमध्ये फक्त 500 रुपये खर्च करून आपण कोणत्याही फिटनेस क्लबचे सदस्य होऊ शकता.

5) नवीन भाषा शिका - फक्त 2000 रुपये खर्च करून आपण कोणतीही परदेशी भाषा शिकू शकता. जी आपल्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल. आज जगामध्ये ज्यांना परदेशी भाषेचं ज्ञान आहे अशा व्यक्तींची मागणी अधिक प्रमाणात होत आहे. फ्रेंच, पोर्तुगीज, जर्मन आणि स्पॅनिश भाषेची माहिती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2015 04:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close