टिपू सुलतान जयंती प्रकरणावरुन विहिंपचा आज कर्नाटक बंद

टिपू सुलतान जयंती प्रकरणावरुन विहिंपचा आज कर्नाटक बंद

  • Share this:

tipu sulltan

13 नोव्हेंबर : टिपू सुलतान जयंतीचा वाद आणखी चिघळत चालला असून विश्व हिंदू परिषदेने राज्यातील काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ आज कर्नाटक बंदची हाक दिली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या या बंदला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे.

टिपू सुलतान जयंतीविरोधी आंदोलनात गेल्या तीन दिवसांत राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विहिंप आक्रमक झाली असून त्याच्या निशेधार्थ हा बंद पाळण्यात येतोय. आजच्या बंदमध्ये विश्व हिंदू परिषदेने विविध ठिकाणी निदर्शनं केली. सरकार तसंच विरोधकांचे पुतळे यावेळी जाळण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे.

दरम्यान, याच कारणावरुन कर्नाटकात धमकीसत्र सुरू झाले आहे.  नाटककार गिरीश कर्नाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर टिपूच्या समर्थकांनी म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिंह यांना फेसबुकवरुन ही धमकी दिली होती. दुसरीकडे याप्रकरणावरुन भाजप आक्रमक झाली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2015 12:23 PM IST

ताज्या बातम्या