वीजेच्या तारेवर चढलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी आली ट्रेन, VIDEO VIRAL

वीजेच्या तारेवर चढलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी आली ट्रेन, VIDEO VIRAL

एक तासाच्या गोंधळानंतर तरुणाला खाली उतरवण्यात यश, वीजेच्या तारांवर चढलेला तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती.

  • Share this:

ग्वाल्हेर, 13 नोव्हेंबर: रेल्वे स्थानकात एक तरुण चक्क वीजेच्या तारांवरुन चालत असल्याचं एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ह्या तरुणाला स्थानकातील प्रवाशांनी खाली उतरण्यासाठी सांगितलं मात्र तरुण कोणाचंही काही न ऐकता दोन्ही विजेच्या तारांना धरुन पुढे चालू लागला. त्याला खाली उतरवण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेनं प्रयत्न करण्यात आले. मात्र सगळे अपयशी ठरले. हा सगळा प्रकार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथल्या डबरा रेल्वे स्थानकात घडला. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना या तरुणाला सुखरुप खाली उतरवण्यात यश आले. या घटनेदरम्यान 1 तास स्थानकात लोकल आणि एक्स्प्रेस बंद ठेवण्यात आल्यानं प्रवाशांमध्ये काहीसं संतापाचं वातावरण होतं. ही घटना डबारा स्थानकाबाहेर घडल्याची माहिती रेल्वेचे डि. व्ही. जनरल कमर्शियल मॅनेजर अखिल शुल्का यांनी दिली.

मंगळवारी सकाळी 6 वाजता एक तरुण डाऊन मार्गावरील विजेच्या खांबावर चढल्याची माहिती मालगाडी चालक गार्डने रेल्वे प्रशासनाला दिली. माहिती मिळताच तात्काळ डबरा स्थानकात रेल्वेचे कर्मचारी आणि आरपीएफ जवान घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला उतरवण्यासाठी रेल्वे लाईनला सुरु असलेला वीजपुरवठा काही काळ बंद करण्यात आला. दरम्यान युवक खांबावरून विजेच्या तारांवरून चालत पुढे जाऊ लागल्यानं त्याला सुखरुप खाली उतरवणं हे कर्मचाऱ्यांसमोर मोठं आव्हान होतं.

एका इंजिनच्या टपावर चढून कर्मचाऱ्यांनी मधोमध विजेच्या तारांवर असलेल्या तरुणाला खाली उतरण्याचं आवाहन केलं. मात्र तरुण तयार नव्हता. तिथेच गोंधळ घालण्यास सुरूवात केली. दरम्यान तासाभरानंतर कर्मचाऱ्यांना तरुणाला खाली उतरवण्यात यश आलं आहे. या संपूर्ण गोंधळावेळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यासोबतच काही ट्रेन्सही सिग्नलला थांबवण्यात आल्या होत्या अशी माहिती शुल्का यांनी दिली. सकाळी 7 वाजल्यानंतर साधारण हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मात्र मोठा अनर्थ टळला.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 13, 2019, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading