छोटा राजनला भारतात आणलं, आज सीबीआय चौकशीची शक्यता धूसर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2015 02:01 PM IST

छोटा राजनला भारतात आणलं, आज सीबीआय चौकशीची शक्यता धूसर

rajan in delhi

06 नोव्हेंबर : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळेज उर्फ छोटा राजनला अखेर आज (शुक्रवारी) सकाळी इंडोनेशियाहून भारतात आणण्यात आलं. सीबीआय अधिकार्‍यांचे  पथक विशेष विमानाने राजनला घेऊन दिल्लीत दाखल झाले. तब्बल २७ वर्षांनी छोटा राजनची भारतवापसी झाली आहे.

आज सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी छोटा राजनला घेऊन येणारे विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले. छोटा राजनला सध्या दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आलं आहे. तिथेचं त्याची चौकशी सुरु आहे. मुख्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एम्स डॉक्टरांचं पथकही सीबीआय मुख्यालयात दाखल झालंय. एम्सचे डॉक्टर छोटा राजनची वैद्यकीय तपासणी करणार आहेत. चौकशी काळात राजनला तिहार जेलमध्ये ठेवलं जाणार असल्याची सीबीआय सूत्रांची माहिती आहे. सीबीआय चौकशी पूर्ण झाल्यानंतरच मुंबई पोलिसांकडे राजनचा ताबा सोपवायचा की नाही याचा निर्णय होणार आहे.

छोटा राजनच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. छोटा राजनला विमानतळावरून सीबीआय मुख्यालयात नेण्यासाठी पोलिसांनी 2 ताफे तयार करण्यात आले होते. त्यापैकी एक पू्र्‌ण ताफा डमी होता. एकाच नंबरच्या दोन बुलेटप्रूफ ऍबेसेडर गाड्यांसह दोन पोलिसांचे ताफे तयार करण्यात आले. एक ताफा दिल्ली स्पेशल सेलकडे नेण्यात आला तर दुसरा ताफा सीबीआय मुख्यालयाच्या दिशेने नेण्यात आला. दोन्ही ताफे एकाच वेळी विमानतळावरुन निघाले. छोटा राजन सीबीआय मुख्यालयाच्या दिशेने जाणार्‍या ताफ्यात होता. मीडीयाला चकवा देण्यासाठई दिल्ली पोलिसांनी हा मास्टर प्लॅन तयार केला होता.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी छोटा राजनच्या सर्व गुन्ह्यांचा तपास आता सीबीआयकडे सोपवला आहे. या तपासात मुंबई पोलिस सीबीआयला आवश्यक ती मदत करेल, असं सरकारने सांगितलं आहे. हा निर्णय म्हणजे मुंबई पोलिसांना मोठा हादरा मानला जातो आहे. त्याच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. आर्थर रोड जेलमध्ये त्याच्यासाठी खास कोठडीही तयार करण्यात आली होती. पण मुंबई पोलिसांच्या या सार्‍या उत्साहावर पाणी फेरलं आहे. मुंबई पोलिसातील काही जण दाऊदला सामील असून मला संपवण्याचा कट रचला जात आहे, असा खळबळजनक आरोप गँगस्टर छोटा राजनने केला होता. त्या पार्श्वभूमीवर राजनविरोधातील गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2015 07:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...