... म्हणून शाहरूखला आठवली असहिष्णुता - मीनाक्षी लेखी

... म्हणून शाहरूखला आठवली असहिष्णुता - मीनाक्षी लेखी

  • Share this:

meenakshi lekhi

05 नोव्हेंबर : पक्षश्रेष्ठींनी कानउघाडणी करूनही भाजपा नेत्यांनी मुक्ताफळे उधळण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. ईडीची नोटीस आल्यानेच शाहरुखला असहिष्णुता आठवली असावी, असं विधान करत भाजपच्या नेत्या मीनाक्षी लेखी यांनीही शाहरुख खानवर टीका केली आहे.

आयपीएलमधील गैरव्यवहाराप्रकरणी शाहरुखला 26 तारखेला ईडीची नोटीस मिळाली आणि 1 किंवा 2 तारखेला भारत असहिष्णू झाल्याचे शाहरुखला वाटले असा खोचक टोला मीनाक्षी लेखी यांनी लगावला. तसंच या नोटीसनंतर भारतातील वातावरण बिघडलं, असं शाहरुखला वाटत असून ही भावना अयोग्य असल्याचं लेखी म्हणाल्या.

भाजपा नेत्यांकडून शाहरुखवर टीका सुरू असतानाच दुसरीकडे या वादात आता बाबा रामदेव यांनीही उडी घेतली आहे. शाहरुख खान प्रसिद्धीसाठी असहिष्णुतेची भाषा करत असल्याची टीका बाबा रामदेव यांनी केली आहे. यापूर्वी भाजप खासदार योगी आदित्यानाथ यांनीही हाफीज सईद आणि शाहरुख एकच भाषा बोलत असल्याने शाहरुखने पाकमध्येच जायला हवे, असं म्हटलं होते. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी शाहरुख खान भारताची प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप केला होता.

भाजप नेत्यांनी शाहरुखबाबत केलेल्या वक्तव्यावर बॉलीवूडमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सलमान खान, अनिल कपूर, अनुपम खेर यांनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी शाहरुख खानविरोधात मुक्ताफळं उधळल्यानंतर आता मन्नतच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 5, 2015, 12:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading