S M L

शाहरुख आणि हाफिज सईदची भाषा एकसारखीच -आदित्यनाथ

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2015 11:11 PM IST

शाहरुख आणि हाफिज सईदची भाषा एकसारखीच -आदित्यनाथ

04 नोव्हेंबर : किंग खान अर्थात शाहरुख खानने असहिष्णुतेच्या मुद्यावर भाष्य करून भाजप नेत्यांची नाराजी ओढून घेतलीये. यात भरात भर पडली ती भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांची. योगी आदित्यनाथ यांनी शाहरुखची तुलना थेट मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अतिरेकी हाफिज सईदशी केलीये. एवढंच नाहीतर शाहरुखच्या सिनेमांवर मुस्लिमांनी बहिष्कार टाकला तर त्याला रस्त्यावर भटकावं लागेल अशी मुक्ताफळंही उधळली.

भाजपचे नेते आदित्यनाथ योगी नेहमी या ना त्या विधानामुळे चर्चेत राहतात. आज शाहरुख खानने असहिष्णुतेच्या मुद्यावर भाष्य केलं. तर दुसरीकडे अतिरेकी हाफिज सईदने शाहरुखला पाकिस्तानात येऊन राहण्याचं आवाहनच केलं. शाहरुखच्या टिप्पणीमुळे भाजप नेत्यांचं पितं चांगलंच खवळलं. त्यांनी थेट शाहरुखवर हल्लाबोल केला.

योगी आदित्यनाथ यांनी मात्र शाहरुखवर सडकून टीका करत मुक्ताफळं उधळली. शाहरुख खानने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. देशातला बहुतांश अल्पसंख्यांक समाज हा त्याचा मोठा चाहता आहे. जर त्यांनीशाहरुखच्या सिनेमावर बहिष्कार टाकला तर शाहरुखला इतर मुस्लिम तरुणांप्रमाणे रस्त्यावर भटकावं लागेल अशी टीकाच त्यांनी केली.


योगी एवढ्यावरच थांबले नाही तर शाहरुखची भाषा अतिरेक्याप्रमाणेच आहे. शाहरुखची भाषा आणि हाफिज सईदची भाषा एकसारखीच आहे असंही म्हटलं. विशेष म्हणजे भाजपचे आणखी एक नेते कैलास विजयवर्गीय यांनीही शाहरुख खान भारतात राहतो पण त्याचा आत्मा पाकिस्तानात, असल्याचं वक्तव्य केलं होतं. भाजपच्या नाराजीनंतर त्यांना आपलं ट्विट मागे घ्यावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2015 07:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close