04 नोव्हेंबर : भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी अभिनेता शाहरुख खानबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजपनं तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. आणि त्यांना आपलं ट्विट मागे घ्यायला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
शाहरुख खान भारतात राहतो पण त्याचा आत्मा पाकिस्तानात, असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण आता त्यांनी सारवासारव केलीय. आणि आपल्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्यात आला. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असं विजयवर्गीय यांनी म्हटलंय. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनीही असंच तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यांवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |