असहिष्णुतेचं वातावरण हा सुनियोजित कट, सोनियांचा आरोप

असहिष्णुतेचं वातावरण हा सुनियोजित कट, सोनियांचा आरोप

  • Share this:

congress march delhi03 नोव्हेंबर : देशभरातल्या सहिष्णुतेच वातावरण बिघडल्याचा दावा करणार्‍या काँग्रेसने आज (मंगळवारी) दिल्लीत राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. देशभरात वातावरण दुषित करण्याचा हा संपूर्ण नियोजित कट आहे असा आरोप सोनिया गांधींनी यावेळी केला.

सोनिया गांधींनी काल सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. देशात असहिष्णुता वाढतेय त्याबाबत राष्ट्रपतींकडे त्यांनी चिंता व्यक्त केली. उत्तर प्रदेशात दादरीमध्ये मुस्लीम व्यक्तीची हत्या झाल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी त्या हत्येबद्दल असंवेदनशील वक्तव्यं केली होती. त्याचा निषेध म्हणून अनेक कलाकार, विचारवंत, इतिहासकार आणि शास्त्रज्ञांनी सरकारकडून मिळालेले पुरस्कार परत केले होते.

याबाबत काँग्रेसचे सर्व नेते आज रस्त्यावर उतरले. राष्ट्रपती भवनावर पोहचल्यानंतर सोनिया गांधी आणि काँगेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे निवेदन दिलं. देशभरात वाढत्या सहिष्णुतेच्या वातावरणामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या परिस्थिीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालाय. हा संपूर्ण नियोजित कट आहे असा आरोप सोनिया गांधींनी यावेळी केला.

दरम्यान, आज शीख समाजातल्या तरूणांनी नवी दिल्लीत निदर्शनं केली. संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेसचा मोर्चा निघण्याआधी शिख समाजातील तरुण तिथे पोहचले. त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार निदर्शन केली. राजीव गांधी यांचं भारतरत्न परत घ्या,अशी शीख तरुणांची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 3, 2015, 6:30 PM IST

ताज्या बातम्या