बिहार निवडणूक: चौथ्या टप्प्यात 57.51% मतदान

बिहार निवडणूक: चौथ्या टप्प्यात 57.51% मतदान

  • Share this:

jkvoting

01 नोव्हेंबर : बिहार विधानसभेच्या 55 जागांसाठी आज मतदान पूर्ण झालं असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.59 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान मतदानाची वेळ संपली असून देखील काही मतदान केंद्रांवर अजूनही लांबच लांब रांगा पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे काही भागातील मतदान केंद्रांवर रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपसाठी हा टप्पा महत्वाचा समजला जात आहे. हे मतदान 5 टप्प्यात होत आहे. शेवटचा फेरी 5 नोव्हेंबरला आहे. 5 नोव्हेंबर रोजी 58 जागांसाठी मतदान होणार आहे. मुझफ्फरपूर, सितामढी, पश्चिमी चंपारण, शिवहार, गोपाल गंज आणि सिवान या जिल्ह्यात मतदान होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 1, 2015, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading