बेळगावात मराठी भाषिकांचा आज 'काळा दिवस'

बेळगावात मराठी भाषिकांचा आज 'काळा दिवस'

  • Share this:

BELGAV BLACK DAY

01 नोव्हेंबर : बेळगावात कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच आहे. बेळगावात आज 1 नोव्हेंबरला काळा दिवस पाळला जातो आहे. पण काळ्या दिवसाची सोशल मीडियावरची जनजागृती रोखण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे. तसंच त्याबद्दल जनजागृती करणार्‍या तरुणांवर काल कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काळ्या दिनाची सोशल मिडियावरची जनजागृती करण्यासाठी फेसबुकवर एक पेज तयार करण्यात आलं आहे. या पेजच्या वॉलपोस्टवर विधानभवनाच्या इमारतीवर भगवा ध्वज दाखवण्यात आला आहे. त्याविरोधात कन्नड रक्षण वेदिका या संघटनेने पोलिसांत तक्रार केली. बेळगाव पोलिसांनी कानडी आणि मराठी भाषिकांत तेढ निर्माण करुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. कलम 153 (अ) अंतर्गत बेळगाव मार्केट पोलिसात केला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, असा आरोप मराठी संघटनांनी केला आहे.

बेळगावात 1 नोव्हेंबर हा दिवस 60 वर्षापासून काळा दिवस म्हणून पाळला जातोय. कर्नाटकच्या भाषावारीचा मराठी बांधवांकडून निषेध करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 1, 2015, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading