S M L

मार्क झुकरबर्ग भारत भेटीवर, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2015 09:44 AM IST

मार्क झुकरबर्ग भारत भेटीवर, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

28 ऑक्टोबर : फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग सध्या भारतात आलाय. आज (बुधवारी) तो दिल्लीमधल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यात फेसबुकच्या मुख्यालयात गेले होते आणि त्यांनीही जगभरातल्या नेटिझन्सशी संवाद साधला होता. अगदी त्याच पद्धतीने मार्क झुकरबर्ग आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी बोलणार आहे.

दिल्लीच्या या कार्यक्रमाच्या आधी झकरबर्गने ताजमहालला भेट दिली आणि फोटोही काढला. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर फोटोही पोस्ट केला. मी जेवढं ताज बद्दल एेकलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने ताजमहल सुंदर आहे. प्रेमाचं प्रतिक मानल्या जाणाऱ्या ताजची रचणा खरंच अदभूत आहे अशी प्रतिक्रिया झुकरबर्गने दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2015 08:24 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close