शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड

शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड

3 फेब्रुवारीपाक खेळाडूंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेने शाहरुख खानला लक्ष्य केलंय. न्यूयॉर्कमध्ये तो जे बोलला ते त्यानं मुंबईत बोलून दाखवावं, अशी धमकीही दिलीय. पण पाक खेळाडूंना इतका कडाडून विरोध करणा-या शिवसेनेने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियाँदादला 'मातोश्री'वर मोठ्या प्रेमाने बोलावून स्नेहभोजन दिले होते. यावेळी उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंबाने मियाँदादची उत्साहाने सरबराई केली होती. 2004 मध्ये 'मातोश्री'वर हा स्नेहसोहळा रंगला होता. जावेद मियाँदाद भारत भेटीवर आला होता तेव्हा दिलीप वेंगसरकरच त्याला मातोश्रीवर घेऊन गेले होते. शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाचा बुरखा फाडणारी ही दृश्ये आहेत.जावेद मियाँदाद हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा व्याही आहे. त्यामुळे त्याचा पाहुणचार करणा-या ठाकरे कुटुंबियांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी केली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2010 09:21 AM IST

ताज्या बातम्या