मोदी सरकार दिशाहीन ; लोकांना आता मनमोहन सिंग आठवताय, शौरींचा भाजपला अहेर

मोदी सरकार दिशाहीन ; लोकांना आता मनमोहन सिंग आठवताय, शौरींचा भाजपला अहेर

  • Share this:

arun shourie modi27 ऑक्टोबर : मोदी सरकार दिशाहीन झाले आहे. पंतप्रधान कार्यालय सर्वाधिक कमकुवत आहे, ठोस काम करण्याऐवजी फक्त बातम्यांमध्ये झळकत राहण्यावर सरकारचा भर आहे अशी टीका भाजपचे नेते अरूण शौरी यांनी करत पक्षाला घरचा अहेर दिलाय. तसंच आता लोकांना माजी पंतपधान मनमोहन सिंग यांची आठवण येत असल्याची बोचरी टीकाही शौरींनी मोदी सरकारवर केली.

प्रसिद्ध पत्रकार आणि 'बिजनेस एडिटर' चे माजी संपादक टीएन निनान यांच्या 'टर्न ऑफ टाटरेइस' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अरुण शौरी यांनी मोदी सरकावर नाराजी व्यक्त केली. आर्थिक धोरणांमध्ये कोणतीही सुधारणा नाही. आर्थिक सुधारणा म्हणजे फक्त बातम्यामध्ये झळकत राहणे असं होतं नाही. वास्तवात यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण, ठोस काम या सरकारकडून होत नाही असं दिसतं अशी टीका शौरींनी केली. तसंच आजची परिस्थिती पाहिली तर लोकांना मनमोहन सिंग यांची आठवण येत आहे अशी बोचरी टीकाही शौरींनी केली. मोदी सरकारनं सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावं, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 27, 2015, 9:56 AM IST

ताज्या बातम्या