S M L

...तरीही राजनला सोडणार नाही, छोटा शकीलची धमकी

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2015 08:37 AM IST

...तरीही राजनला सोडणार नाही, छोटा शकीलची धमकी

27 ऑक्टोबर : कुख्यात गँगस्टर छोटा राजन, उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजेला इंडोनेशियात बेड्या ठोकण्यात आल्यात. पण, राजनच्या अटकेमुळे गँगस्टर छोटा शकीलचं पितं खवळलंय. राजनच्या अटकेमुळे आपण समाधानी नाही. राजनला सोडणार नाहीच अशी धमकी शकीलने दिलीये. शकीलने एका इंग्रजी दैनिकाला फोन करून अटकेवर नाराजी व्यक्त केलीये.

दुश्मन खत्म हो, हेच आमचं धोरण आहे. मुळात आमच्या माणसांनी राजनची कोंडी केली होती. त्यामुळे त्याने अटक करून घेतली असा दावाही शकीलने केली. छोटा शकील हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात आहे. शकीलने याआधीही राजनवर अनेकदा हल्ले केले होते. काही दिवसांपूर्वीच राजनवर बँकॉकमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान राजनने पळ काढून आपला जीव वाचवला.

या हल्ल्यानंतर गँगवार भडकणार अशी शक्यता होती. पण या गँगवारला काल सोमवारी वेगळ वळण मिळालं. इंडोनेशियातील बाली बेटावर राजनला अटक करण्यात आली. राजन आता पोलिसांच्या ताब्यात आहे. आठवड्याभरात त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सीबीआय आणि मुंबई पोलिसांची एक टीम इंडोनेशियाला जाऊ शकते. दरम्यान, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग रविवारपासून इंडोनेशियात होते अशी माहिती कळतेय. भारत सरकारच्या वतीनं ते पोलिसांशी समन्वय साधत होते. आम्ही इंडोनेशियन सरकारच्या संपर्कात आहोत, अशी प्रतिक्रिया सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2015 08:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close