'त्या' नराधमांना नपुंसक करा - मद्रास कोर्ट

'त्या' नराधमांना नपुंसक करा - मद्रास कोर्ट

  • Share this:

Madras Highcourt

  26 ऑक्टोबर : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना नपुंसक करा, असं परखड मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. देशात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढत असताना न्यायालय शांत बसू शकत नाही, असं मत उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केलं आहे.

लहान कळ्यांना फुलण्याआधीच नष्ट केलं जातं. असं कृत्य करणार्‍या नराधमांना यापेक्षा दुसरी शिक्षा कोणतीही असू शकत नाही. ज्यावेळी एखाद्या गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यास कायदा कमी पडतो किंवा निरुपयोगी ठरतो. त्यावेळी समोर जे काही घडते आहे, ते बघत न्यायालय शांत बसू शकत नाही. देशाच्या विविध भागांत सध्या ज्या काही घटना घडताहेत, त्या भयानक आणि क्रूरतेची सीमा ओलांडणार्‍या आहेत. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा सक्तीने समावेश करावा, अशीही सूचना न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. बलात्कार करणार्‍यांना मानवी हक्कांच्या दृष्टीकोनातून दया दाखवणं हे एक प्रकारे अशा गुन्ह्यांना पाठिंबा देण्यासारखेच असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. सुरुवातीला या निर्णयावर टीकाही होईल, मात्र सकारात्मक पद्धतीनं हे समजून घेतलं पाहिजे, असंही ते म्हटलं. न्यायालयाच्या या टिपण्णीमुळे बलात्काराच्या शिक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2015 04:37 PM IST

ताज्या बातम्या