पाकचा खोटारडेपणा उघड, लादेन पाकिस्तानातच होता !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2015 10:29 PM IST

पाकचा खोटारडेपणा उघड, लादेन पाकिस्तानातच होता !

13 ऑक्टोबर : पाकिस्तानचा खरा चेहरा आता समोर आलाय. 2011 साली ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानात ठार केल्यावर ओसामा पाकिस्तानात होता हे आम्हाला माहीतच नव्हतं असा कांगावा पाकिस्तानने केला होता. पण, आता या प्रकरणातली खरी माहिती पाकिस्तानच्या माजी संरक्षणमंत्र्यांच्या तोंडूनच बाहेर आली आहे. ओसामा पाकिस्तानात असल्याची माहिती पाकिस्तान सरकार आणि हेरखात्याला होती असं पाकचे तत्कालीन संरक्षण मंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी आयबीएन नेटवर्कला दिलेल्या खास मुलाखतीत दिली आहे.PakOsamaLinkRevealed

2 मे 2011 च्या त्या रात्रीने जगच बदलून गेलं...आणि जगाच्या इतिहासात कायम नोंद होईल अशी घटना घडली...हाच होता दहशतवादविरोधी जागतिक युध्दातला निर्णायक क्षण...कारण याचवेळी मारला गेला, जगातला मोस्ट वाँटेड मॅन....ओसामा बिन लादेन

आपल्याला आणि संपूर्ण जगाला आतापर्यंत माहीत असलेला घटनाक्रम हा असाच आहे.

जे घडलं, ते याच शब्दात अनेकवेळा सांगितलं गेलं. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 100 किलोमीटरवर असलेल्या ऍबोटाबाद या लष्करी छावण्यांच्या शहरात या सुसज्ज कंपाउंडमध्ये ओसामा बिन लादेन राहत होता. 1 मे 2011 च्या रात्री अमेरिकन नेव्ही सील्स पथकातले 6 स्पेशल ऑफिसर्स त्यांच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये बसून अफगाणिस्तानहून निघाले.

रडारच्या कक्षेत न येण्यासाठी ही हेलिकॉप्टर्स कमी उंचीवर उडत होती. या हेलिकॉप्टर्समधून आलेल्या सैनिकांच्या पथकाने ऍबोटाबादमध्ये केलेल्या या कारवाईत अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन त्याचा भाऊ, त्याचा एक नोकर आणि इतर दोघेजण ठार झाले. ही कारवाई जवळजवळ 3 तास चालली.

Loading...

एकीकडे हे ऑपरेशन चालू होतं तर दुसरीकडे व्हाईट हाऊसमध्ये बराक ओबामा पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीत सामील झाले होते. डोक्यात एकीकडे ऍबोटाबादच्या कारवाईचे विचार चालू असले तरी वरकरणी त्यांना हसरा चेहरा ठेवावा लागत होता. ऍबोटाबादमधल्या या विलक्षण घडामोडींविषयीचा गौप्यस्फोट बराक ओबामांनी त्या रात्री उशिरा एका पत्रकार परिषदेत केला.

यावेळी ते पाकिस्तान आणि ऍबोटाबादच्या कारवाईविषयी बोलले. या सगळ्या प्रकरणाविषयी पाकिस्तानला काहीच माहिती नव्हती

अर्थात पाकने दावा तरी तसाच केला.

जगातला सगळ्यात धोकादायक दहशतवादी आपल्याच भूमीवर आहे. याची पाकिस्तानला खरंच कल्पना नव्हती का?

ओसामा बिन लादेन पाकिस्तानात नऊ वर्षं राहत होता आणि पाकिस्तानला काही माहीत नव्हतं?

पाकिस्तानी सरकार, लष्कर ,गुप्तचर संस्था किंवा पाकिस्तानी जनता यापैकी कोणालाही ओसामा पाकिस्तानात असल्याची माहिती नव्हती?की ही गोष्ट माहित असून लपवली गेली?

आम्ही आता तुमच्यासमोऱ आणत आहोत एक पूर्ण सत्य...ओसामा बिन लादेन पाकिस्तानात आहे याविषयी पाकिस्तान सरकार ला पूर्ण कल्पना होती. हेच सत्य पाकिस्तानने अनेक वर्षं लपवून ठेवलं आणि खोटा कांगावा केला.

ओसामा बिन लादेनविषयी गेली दशकभर खोटं बोलणार्‍या पाकिस्तानचा दावा या गौप्यस्फोटामुळे आता फोल ठरलाय आणि गेली 30 वर्षं दहशतवादाचा बळी ठरलेल्या भारताची बाजू नि:संदेहपणे आणि निर्णायकरीत्या खरी ठरलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2015 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...