S M L

गायींना वाचवण्यासाठी मरायला आणि मारायलाही तयार -साक्षी महाराज

Sachin Salve | Updated On: Oct 6, 2015 03:17 PM IST

गायींना वाचवण्यासाठी मरायला आणि मारायलाही तयार -साक्षी महाराज

06 ऑक्टोबर : गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दिल्लीजवळच्या दादरीमध्ये अखलाकची हत्या झाली होती. त्यावरचं राजकारण अजूनही सुरूच आहे. त्यातच आता गायींना वाचवण्यासाठी प्रसंगी मरायला किंवा मारायला तयार आहोत असं वादग्रस्त विधान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केलंय.

साक्षी महाराज यांनी समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्यावर घणाघाती टीका केली. आझम खान हे पाकिस्तानचे हस्तक आहे. ते कधी भारत मातेबद्दल अभद्र बोलता तर कधी अमित शहांना सैतान म्हणता. मुळात त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. त्यांना आग्रा किंवा रांचीमधील मनोरुग्णालयामध्ये भरती करा अशी टीका साक्षी महाराज यांनी केली. तसंच दादरी प्रकरणातील मृत अखलाकच्या कुटुंबियांना 45 लाखांची मदत देण्यात आली. त्यांना 50 लाखांची मदत देण्यात जरी आली त्याला आपला विरोध नाही. पण, वक्फ बोर्डाच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एका वयोवृद्ध मुस्लीम व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांना मदत का देण्यात आली नाही असा सवालही साक्षी महाराज यांनी उपस्थित केला. अखलाकने अखेरचा फोन आपले मित्र सिसोदिया यांना केला होता. फोनवर आपल्याकडे गोमांस ठेवण्यात आलंय मला वाचवा अशी विनवणी केली होती. आमच्या मातेचा कुणी अपमान करत असेल तर सहन करणार नाही. गायींना वाचवण्यासाठी वेळप्रसंगती मरण्यासाठी आणि मारायला पण तयार आहोत. सीमेवरही भारत मातेसाठी जवान शहीद होत असतात असंही ते म्हणाले.

दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे आझम खान आणि भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ आज दादरीला भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारनं याप्रकरणी आपला अंतिम अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सादर केलाय. या अहवालात जमावानं हत्या केल्याचा उल्लेख टाळण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2015 01:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close