चितगाव टेस्टमध्ये भारताचा विजय

चितगाव टेस्टमध्ये भारताचा विजय

21 जानेवारी भारतीय टीमने अपेक्षेप्रमाणेच चितगाव टेस्ट जिंकली. भारतीय बॉलर्सनी बांगलादेशची दुसरी इनिंग 301 रन्समध्ये गुंडाळली. आणि भारताने ही टेस्ट 113 रन्सनी जिंकली. सकाळच्या सेशनमध्ये ईशांत शर्माने धारदार बॉलिंग करत बांगलादेशची मिडल ऑर्डर उध्वस्त केली. सुरुवातीच्या धक्क्यातून बांगलादेशची टीम सावरलीच नाही. मुश्फिकार रहीमने सातव्या क्रमांकावर बॅटिंगला येत 101 रन्सची इनिंग खेळत भारताचा विजय लांबवला. पण अखेर रहीम आऊट झाला आणि बांगलादेशची झुंज संपुष्टात आली. गौतम गंभीरच्या शानदार इनिंगच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर 415 रन्सचं बलाढ्य टार्गेट ठेवलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही शानदार सेंच्युरी केली होती.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2010 10:58 AM IST

ताज्या बातम्या