एफडीआयमध्ये भारत नंबर 1, चीनलाही टाकलं मागे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2015 09:10 AM IST

एफडीआयमध्ये भारत नंबर 1, चीनलाही टाकलं मागे

fdi india modi330 सप्टेंबर : थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय)मिळवण्यात भारताने पहिला नंबर पटकावलाय. जून 2015 पर्यंत भारतात 31 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाल्याचा अहवाल फायनान्शियल टाइम्सने जाहीर केलाय. भारताने चीन, अमेरिकेला या देशांना मागे टाकलंय.

चीनपेक्षा 4 अब्ज आणि अमेरिकेपेक्षा 3 अब्ज डॉलर्सची अधिक गुंतवणूक भारतानं खेचलीय. गेल्या वर्षी भारत 5व्या नंबरवर होता. नरेंद्र मोदी सरकारसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार अनेक पावलं उचलतंय. सरकारच्या प्रयत्नांना यश आल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलीये. परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे उपक्रम सरकारनं सुरू केले आहे. एवढंच नाहीतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरे करून उद्योगपती, सीईओंची थेट भेट घेऊन भारतात व्यवसाय करण्यास आवाहन केलं होतं.

एफडीआयमध्ये टॉप 10 देश

भारत - 31 अब्ज डॉलर

चीन - 28 अब्ज डॉलर

Loading...

अमेरिका - 27 अब्ज डॉलर

ब्रिटन - 16 अब्ज डॉलर

मेक्सिको - 14 अब्ज डॉलर

इंडोनेशिया - 14 अब्ज डॉलर

व्हिएतनाम - 8 अब्ज डॉलर

स्पेन - 7 अब्ज डॉलर

मलेशिया - 7 अब्ज डॉलर

ऑस्ट्रेलिया - 7 अब्ज डॉलर

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2015 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...