विदर्भ बंद यशस्वी

20 जानेवारी स्वतंत्र विदर्भासाठी पुकारलेल्या बंदला विदर्भवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावा विदर्भ राज्य संग्राम समितीने केला आहे. विदर्भातल्या सर्व शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी रेलरोको आणि रास्तारोको करण्यात आलं. नागपूर : राज्याची उपराजधानी असणार्‍या नागपुरातही विदर्भ बंदला चांगला प्रतिसाद मिळला. नागपुरात यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळ ठोकण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी करत याच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयालाही टाळं ठोकलं. तर दुसरीकडे रिझर्व बँक चौकात आंदोलन करणार्‍या बहुजन एकता मंचच्या सुलेखा कुभांरे यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. शहरातल्या शाळा, बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. बससेवाही बंद ठेवण्यात आली होती. मॉल्स आणि शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती. नागपूरच्या विधिमंडळाच्या बोर्डावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य असं लिहिलं.वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूरमध्ये सामाजिक कार्यकर्त्या रुपाताई कुलकर्णी यांनी राजधानी एक्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. आंदोलकांनी शहरातल्या कामठी रोडवरही रास्तारोको केलं. शहरात एसआरपीच्या 5 कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. तुरळक घटना वगळता शहरात शांततेत बंद पार पडला.अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे स्टेशनपासून 30 कि.मी. अंतरावर विदर्भवादी आंदोलकांनी विदर्भ एक्सप्रेस अर्धा तास रोखून धरली होती. तर मुंबई- हावडा मेलही रोखण्याचा प्रयत्न केला. शहरातील बहुतेक सर्व व्यवहार बंद होते. अमरावती शहरातल्या ऑटोरिक्षाही बंद होत्या. तर एस. टी. महामंडळाच्या तुरळक बसेस सुरु होत्या. शहरात एसआरपीच्या 4 अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. अमरावती महानगरपालिकेत सर्वपक्षीय वेगळ्या विदर्भाचा ठराव ठेवण्यात आला. सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र यावर प्रचंड गोंधळ झाल्योने सभा तहकूब करावी लागली. शिवसेना, काँग्रेसच्या सदस्यांनी या प्रस्तावाचा विरोध केला. शिवेसनेनं वेगळ्या विदर्भाला या आधीपासूनच विरोध केलाय. त्यामुळे हे आंदोलन हा बंद सर्वपक्षीय असला तरी त्यात शिवसेनेचा सहभाग नव्हता त्यामुळे अमरावतीत शिवसेनेने वेगळ्या विदर्भाच्या मागणीविरुध्द प्रतिआंदोलन केलं. विदर्भ बंदच्या निमित्ताने बंद करण्यात आलेली दुकानं पुन्हा उघडण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. मात्र त्याला फार प्रतिसाद मिळाला नाही. अमरावतीतल्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर आंदालकांनी ठिय्या मांडला होता. तर पोलिसांनी आंदोलकांना शहरात फिरायला मज्जाव केल्याने पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आंदोलकांनी आरोप केला. दुसरीकडं खापरी गावाजवळ आंदोलकांनी नॅशनल हायवे क्रमांक 7 रोखण्याचा प्रयत्न केला.यवतमाळ : यवतमाळमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातली सर्व शाळा, कॉलेजेस, बाजारपेठा बंद आहेत. पूर्णा -अकोला रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या 15 आंदोलकांना अटक करण्यात करण्यात आली. अकोला : अकोला अर्बन बँकेवर विदर्भवाद्यांनी दगडफेक केली. अकोल्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात ही दगडफेकीची घटना घडली. चंद्रपूर : चंद्रपूरमध्येही विदर्भ बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व शाळा, कॉलेजेस, बाजारपेठा बंद होत्या. नागभीड तालुक्यातले गावकरी रस्त्यावर उतरले होते. विदर्भ बंदला पाठींबा देण्यासाठी गावकर्‍यांचा रास्ता रोको केला. तर चंद्रपुरमध्ये राजुरा इथे एका पती पत्नी BSNL च्या दोन टॉवरवर चढून आपला विरोध दर्शवला. तर माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली राजुरातून आंध्र प्रदेशात जाणारा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. गडचिरोली : गडचिरोलीतल्या सर्व तालुक्यात कडकडीत बंद होता. कुरखेडा भागात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या. संपूर्ण जिल्हात बंदला 90 टक्के प्रतिसाद मिळाला.नक्षलवाद्यांच्या कारवाया पाहता जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वर्धा : वर्ध्यातल्या बजाज चौकात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी कामगार नेते भास्कर इथापे यांनी तर स्वत:ला गाडून घेतलं. त्यांना पोलिसांनी बाहेर काढलं. आर्वी वर्धा मार्गावर येळाकेळी इथे विदर्भवाद्यांनी रस्तावर टायर जाळून रस्ता रोको केला.वाशिम : वाशिम जिल्ह्यातही कडकडीत बंद आहे पाळण्यात आला. शाळा कॉलेजेस 100 टक्के बंद ठेवण्यात आली. व्यापार्‍यांनी आपापली दुकानं बंद ठेवली. इथली बससेवा मात्र सुरू होती. वाशिममध्ये आंदोलकांनी नागपूर- औरंगाबाद हायवे तासभर रोखून धरला होता. 100हून अधिक कार्यकर्ते या रास्ता रोकोत सहभागी झाले होते. गोदींया शहरात सर्व व्यापार्‍यांनी आपापली दुकानं बंद ठेवलीयत. शाळा कॉलेजेस बंद होती आणि बँकेचे व्यवहार ठप्प होते. तर भंडार्‍यात बसेसच्या काचा फोडण्याच्या दोन चार घटना घडल्या. विदर्भवाद्यांनी रस्त्यावर ठिकठिकाणी टायर जाळून रास्ता रोको केला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2010 02:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2010 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...