समाजातील हिंसेला पुरूषच जबाबदार- मनेका गांधी

समाजातील हिंसेला पुरूषच जबाबदार- मनेका गांधी

  • Share this:

Maneka-Gandhi-27022015

15 सप्टेंबर : देशात घडणार्‍या प्रत्येक हिंसेमागे पुरूषाचा हात असतो. किंअसं धक्कादायक वक्तव्य केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी केलं आहे. मेनका गांधींच्या वक्तव्यामुळे देशात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

समाजातल्या हिंसेला पुरुष कारणीभूत असतात. त्यामुळे आजच्या पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रियांविषयी जागरुकता निर्माण करणं गरजेचं असल्याचंही मेनका गांधींनी स्पष्ट केलं आहे. यासाठी समाजातील पुरुषांनीच पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी फेसबुकवरील लाईव्ह चर्चेत व्यक्त केलं. या प्रश्नावर तोडगा काढायचा असल्यास शालेय जीवनापासून सुरूवात केली पाहिजे. त्यासाठी महिला आणि बालकल्याण मंत्रालय 'जेंडर चँपिअन' संकल्पना शाळांमध्ये राबवणार आहे. ज्याच्यात मुलींसोबत चांगली वर्तणूक करणार्‍या मुलाला बक्षिस देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 15, 2015, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading