S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दाऊदला भारतात आणण्यासाठी 'साम, दाम, दंड, भेद'चा वापर करू - राज्यवर्धन राठोड

Samruddha Bhambure | Updated On: Sep 7, 2015 01:03 PM IST

दाऊदला भारतात आणण्यासाठी 'साम, दाम, दंड, भेद'चा वापर करू - राज्यवर्धन राठोड

07 सप्टेंबर : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद या दोघांना पकडण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली आहे. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राठोड यांनी ही माहिती दिली.

यावेळी राठोड यांना दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी सरकार म्यानमारप्रमाणे एखादी धडक मोहीम का राबवत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना राठोड यांनी सांगितले की, हो असे होऊ शकते. पण, अशी कारवाई झालीच तर त्याआधी उघडपणे चर्चा होणार नाही. ही कारवाई पार पडल्यानंतरही चर्चा होईल किंवा नाही याबद्दल मी निश्चितपणे सांगू शकत नाही.


मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेला दाऊद गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानात लपून बसला आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी आम्ही कागदपत्रांची वाट पाहत बसणार नाही. त्यासाठी भारताकडे अन्य पर्यायही आहेत. त्यामध्ये साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांनी प्रयत्न केले जातील.

भारताचा शत्रू कुठेही लपून बसला असेल तरी त्याने भारताचे त्याच्याकडे लक्ष नाही, असा गैरसमज करून घेऊ नये. या शत्रूंवर सतत नजर ठेवण्यात येत असून भारत कधीही त्यांच्याविरोधात कारवाई करू शकतो, असा इशारा राठोड यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2015 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close