आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाचा तडाखा; वीज कोसळून 22 ठार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2015 12:20 PM IST

आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाचा तडाखा; वीज कोसळून 22 ठार

asfrsearwepy

07 सप्टेंबर : आंध्र प्रदेशला रविवारी मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली, तर राज्याच्या विविध भागात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकट्या नेल्लोर जिल्हय़ात 6 जण ठार झाले आहेत.

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. अंगावर वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रूपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

दरम्यान, तेलंगना राज्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2015 11:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...