पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांचे मानले आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांचे मानले आभार!

एकीकडे सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा निकाल देत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले.

  • Share this:

डेरा बाबा नानक, 09 नोव्हेंबर : गुरु नानक देव यांच्या पवित्र स्थळ असलेल्या डेरा बाबा नानक साहिब येथे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या करतारपूर कॉरिडोर(Kartarpur Corridor)चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. शनिवारी गुरदासपूरमधील डेरा बाबा नानक इथ पंतप्रधान मोदी बेर साहिब गुरुद्वारात गेले. त्यानंतर झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पवित्र ठिकाणी येऊन धन्य झाल्याचा अनुभव आला असं म्हटलं. गुरु नानक देवजी फक्त शिख किवा भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायक आहेत असंही मोदी म्हणाले.

करतारपूर कॉरिडोर तयार झाल्याने गुरुद्वाराचं दर्शन सहज शक्य होईल. मी पंजाब सरकार आणि याच्याशी संबंधित सर्व लोकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आभार मानले. यावेळी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांचे आभार मानताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तान सरकारने भारतातील शिख समुदायाच्या भावना समजून घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुरुद्वारा दरबारात जाणाऱ्या 500 हून अधिक भारतीय भाविकांना हिरवा झेंडा दाखवतील. भारताच्या गुरदासपूर जिल्ह्यात डेरा बाबा नानक गुरुद्वारा पाकिस्तानमधील करतारपूर साहिब गुरुद्वाराला करतारपूर कॉरि़डॉरद्वारे जोडला गेला आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नारोवाल जिल्ह्यात करतारपूरप्रयंत जाणाऱ्या कॉरिडोरला गुरु नानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वानिमित्त याचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यादरम्यान टर्मिनल भवनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 4.5 किमी लांबीच्या कॉरिडॉरमधून जाण्यासाठी या भवनमध्या परवानगी देण्यात येईल.

शिरोमणि गुरुद्वारा प्रबंध कमिटीचे सदस्य आणि पंजाबमधील सर्व 117 आमदार आणि खासदार पहिल्या गटात असणार आहेत. पंजाब सरकारचे मंत्री तृप्त राजिंदर सिंग यांनी सांगितलं की पहिल्या गटातील सर्व सदस्यांना सकाळी दहा वाजेपर्यंत पोहचण्यास सांगण्यात आलं होतं.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

Published by: Suraj Yadav
First published: November 9, 2019, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading