कामगारांनी उपसले 'संपास्त्र', उद्या बँकाही राहणार बंद !

कामगारांनी उपसले 'संपास्त्र', उद्या बँकाही राहणार बंद !

  • Share this:

worker strike01 सप्टेंबर : उद्या देशभरातील कामगारांनी संपाचे अस्त्र उपसले आहे. केंद्र सरकारची धोरणं कामगार विरोधी आहेत आणि त्याविरोधात आम्ही संप करतोय, असं कामगार संघटनांचं म्हणणं आहे. सरकारी बँक कर्मचारी संघटनांचाही या संपाला पाठिंबा आहे. त्यामुळे बँका उद्या बंद राहतील आणि ऑनलाईन व्यवहारांवरही याचा परिणाम होईल. या संपात 10 लाख कर्मचारी सहभागी होणार आहे. संपात 2 लाख विमा कर्मचारी सहभागी होतील. टॅक्सीच्या संपामागे उबर, ओला या खाजगी टॅक्सींना विरोधाचं कारण आहे. तर बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संपावर जातायत. देशभरातल्या कामगार संघटनांचीही कामगार कायद्यात बदल करा, अशी मागणी आहे.

बँकिंग आणि विमा व्यवसायातील सर्व संघटना, देशातील सर्व केंद्रीय संघटना आणि औद्योगिक फेडरेशनने पुकालेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. देशातील 30 कोटी कामगार शेतकर्‍यांच्या एकजुटीच्या संघर्षात 10 लाख बँक कर्मचारी आणि 2 लाख विमा कर्मचारी सहभागी आहेत. या संपात राष्ट्रीय बँका आणि विमा क्षेत्राशी संबंधीत सर्व प्रमुख संघटना सहभागी होणार आहेत. यासोबतच रिझर्व बँक, नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण बँक, आयडीबीआय, सिडबी आणि ऑल इंडिया को ऑपरेटीव्ह बॅक एम्प्लाईज फेडरेशन आणि विमा व्यवसायातील सर्व संघटना सहभागी आहेत. त्यामुळे या संपामुळे कोणतेही बँकिंग व्यवहार ,चेक पूर्णपणे बंद राहणार आहेत.

आता मार्ग फक्त हाच आहे की, सरकार आणि संघटनांमधली बोलणी यशस्वी झाली, तरच हा संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. कोळसा, उर्जा, सिमेंट, वस्त्रौद्योग क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजप सरकार जे नवे कायदे आणि धोरणं बनवतंय, ती कामगार विरोधी आहेत, अशी कामगार संघटनांची तक्रार आहे.

बँक कर्मचारी उद्या संपावर

संपात 10 लाख कर्मचारी सहभागी होणार

संपात 2 लाख विमा कर्मचारी सहभागी होणार

या संघटना होणार संपात सहभागी

1) ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA)

2) ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA)

3) बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI)

4) इंडियन नॅशनल बॅक ऑफिसर्स काँग्रेस (INBOC)

5) इंडियन नॅशनल बँक एम्पॉईज फेडरेशन (INBEF)

बँक कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्या

1. बँक क्षेत्राशी संबंधित 44 कामगार कायदे एकत्र करून फक्त 5 कायदे करावेत

2. किमान वेतन कायद्यात 15 हजार वेतनाची तरतूद हवी

3. राष्ट्रीय बँकांचे खाजगीकरण आणि विलीनीकरण तात्काळ थांबवावं

4. राष्ट्रीय बँकांचा विस्तार करावा

5. कर्ज बुडवणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 1, 2015, 8:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading