पेट्रोल 2 रुपये, डिझेल 50 पैशांनी स्वस्त

पेट्रोल 2 रुपये, डिझेल 50 पैशांनी स्वस्त

  • Share this:

petrol_34

31 ऑगस्ट : पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात झाली आहे. पेट्रोल 2 रुपये आणि डिझेल 50 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे महागाईने वैतागलेल्या सर्वसामान्य जनतेला सरकारने चांगलाच दिलासा दिला आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती उतरल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. याआधी 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल 1 रुपया 27 पैसे, तर डिझेल 1 रुपया 17 पैशांनी स्वस्त झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 31, 2015, 7:00 PM IST

ताज्या बातम्या